दीपक बिडकर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते आणि सोशल मिडिया प्रमुख पदावर नियुक्ती
पुणे :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदावर दीपक बिडकर यांची फेर निवड करण्यात आली असून पक्षाच्या सोशल मिडिया प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे .
राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पुण्यात मेरीयट हॉटेल येथे झाली . या बैठकीत पक्षाध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी ही घोषणा केली .
प्रदेश प्रवक्ते पदाच्या नियुक्तीचे पत्र प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कोकरे आणि सयाजी पाटील यांनी आज दीपक बिडकर यांना दिले . पत्रकारितेचा २० वर्षांचा अनुभव असलेले दीपक बिडकर हे पुण्यातील ‘प्रबोधन माध्यम ‘ या न्यूज एजेन्सी चे १२ वर्षांपासून संचालक आहेत . पुण्यातील पत्रकारिता ,जनसंपर्क ,सामाजिक ,पर्यावरण क्षेत्रात त्यांचे योगदान आहे .
सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ,सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह(पर्यावरण संवर्धन ) ,सेव्ह पुणे इनीशिएटिव्ह (नागरी प्रश्न ), ‘सर्व धर्मीय दिवाळी ‘ , गटारी अमावास्येला ‘सामुहिक दीप पूजन करून व्यसन मुक्तीची शपथ ‘ ,’प्रबोधन पाहुणचार ‘,’नगरसेवक कार्य अहवाल स्पर्धा ‘, रंगभूमीवरील back स्टेज आर्टिस्ट साठी निधी संकलन ,दुष्काळ ग्रस्तांना मदत हे त्यांचे उपक्रम लोकप्रिय ठरले आहेत .
रासप मध्ये एक वर्षापूर्वी प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षाची धेय्य धोरणे वाहिन्यांवर ,माध्यमातून मांडणे ,प्रसिद्धी ,प्रशिक्षण शिबिरे या योगदानासह ‘ ‘रासप समाचार ‘ या ऑनलाईन मुख पत्राची स्थापना केली . दर शनिवारी प्रसिद्ध होणारे हे ऑन लाईन साप्ताहिक कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत प्रिय ठरले आहे . दीपक बिडकर संस्थापक संपादक असलेल्या ३६ आठवडे सलग प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकाची वर्ष पूर्ती जवळ आली आहे
सोशल मिडिया प्रमुख पदावर कार्य करताना दीपक बिडकर यांना संतोष कोल्हे आणि दत्ता ढाकणे यांचे सहाय्य मिळणार आहे
‘ वंचितांना न्याय आणि प्रगतीच्या संधी ,लोक कल्याणकारी राज्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट सर्वांसमोर असले पाहिजे ,त्यासाठी आपण समाजकारण करीत आहोत . ही नियुक्ती राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करीत असून पक्षाचे संस्थापक आमदार श्री महादेव जानकर यांचे विनम्र आभार मानत आहोत ‘ असे दीपक बिडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले