पुणे :
‘दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या नवीन इमारतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘रोटरी क्लब पुणे प्राईड रक्तपेढी’चे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते झाले
. हा समारंभ शुक्रवार, दिनांक 4 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सौद बाहवान कक्ष, 8 वा मजला, दीनानाथ मंगेशकर रूग्णालय, एरंडवणे येथे आयोजित करण्यात आला होता .
रोटरी इंटरनॅशनलचे माजी आंतर राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण बॅनर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते , रोटरी 3131 चे प्रांतपाल सुबोध जोशी, मोहन पालेशा, डॉ.मंदा आमटे, पंडीत हृदयनाथ मंगेशकर, रूग्णालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते
‘रोटरी क्लब पुणे प्राईड रक्तपेढी’च्या उद्घटनानिमित्त सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. संजीव केतकर यांनी संयोजन केले
रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडने पुढाकार घेऊन उभारलेल्या या प्रकल्पामधे ‘रोटरी फौन्डेशन’चा आणि दक्षिण कोरियाच्या ‘रोटरी क्लब ऑफ सनराईज’चा मोठा सहभाग आहे. दरवर्षी 25,000 हून अधिक रुग्णांना या नव्या सुविधेचा लाभ होणार आहे. याच ‘पुणे प्राईड क्लब’ने दीनानाथ रुग्णालयाला दूर अंतरावर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक फिरते वाहनही दिले आहे. ‘रोग प्रतिबंध आणि उपाय’ या रोटरीच्या उपक्रमाअंतर्गत हा प्रकल्प उभारला आहे.
पुण्यातील सर्वात मोठी रक्तपेढी
————–
ही रक्तपेढी विद्यमान पेढीपेक्षा अडीच पटीने मोठी आहे. यामधे रक्ताचे विविध घटक वेगवेगळे करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आहेत. रक्ताची योग्य तपासणी करण्यासाठी आणि त्याचा मागोवा राखण्यासाठी सुविधा आहेत. 5,500 हजार चौरस फुटांहून अधिक जागा व्यापलेली ही पुण्यातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक रक्तपेढी आहे. रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 6 महिन्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या रक्तपेढीत जमा करून प्रक्रिया केलेल्या रक्तापैकी काही भाग हा समाजातील गरीब वर्गातील रुग्णांसाठी मोफत किंवा कमी खर्चात उपलब्ध करून दिला जाईल.



