दिव्य कुरआन आणि आधुनिक विज्ञान या मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्टचे चेअरमन मुन्नवर पीरभाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले . पुणे कॅम्प भागातील नवा मोदीखाना येथील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार सोमनाथ देशकर , प्रमोद गवळी , सुरज व्यास , डॉ . रफिक सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्टचे चेअरमन मुन्नवर पीरभाई यांनी सांगितले कि , सर्व धर्मीयसाठी दिव्य कुरआन आणि आधुनिक विज्ञान हे पुस्तक मराठी भाषेत असल्यामुळे मार्गदर्शक ठरणार आहे .
डॉ . रफिक सय्यद यांनी सांगितली कि , दिव्य कुरआन आणि आधुनिक विज्ञान हे पुस्तक चित्र स्वरूपात असल्याने व साध्या सोप्या मराठी भाषेत असल्याने सर्व सामान्य माणसाला या पुस्तकातून नक्कीच खूप माहिती मिळेल .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत समीर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन शफाक्कत शेख यांनी केले तर आभार मोहम्मद रफिक खान यांनी मानले .