दिवाळी भेट – डीझेल अडीच रुपये स्वस्त होणार
नवी दिल्ली – डिझेलच्या दरात लवकरच कपात केली जाणार असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. प्रधान म्हणाले, डिझेलच्या दरात जवळपास अडीच रुपयांनी स्वस्त होईल, दोन राज्यातील आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबरनंतर घोषणा होईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घट होत असल्याने डिझेलच्या किरकोळ विक्रीवरील नफा वाढला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना 3 रुपये 56 पैसे प्रति लिटर नफा मिळत आहे. परिणामी डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझेलच्या दरात कपात झाली तर एवढी मोठी कपात होण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल.
देशात महाराष्ट्र आणि हरियाणा येथे विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबरनंतर दर कपातीबाबत घोषणा होईल. यापूर्वी 8 सप्टेंबर 2010 रोजी डिझेल 3 रुपये 35 पैसे प्रतिलिटरने स्वस्त झाले होते.
पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी (14 ऑक्टोबर) पेट्रोलच्या दरात एक रुपयाने कपात केली. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. डिझेलच्या दरात कपात झाल्यास सणासुदीच्या दिवसांत देशातील जनतेला दिलासा मिळणार आहे. महागाई कमी होण्यास हातभार लागू शकेल. डिझेल दर कपातीलचा सकारात्मक परिणाम दळणवळण क्षेत्रात होत.
सरकारने पेट्रोलियम कंपन्यांवरील नियंत्रण हटवल्याने जानेवारी 2013 पासून डिझेलच्या दरात प्रति महिना 50 पैशाने वाढ केली जात आहे. मागील 20 महिन्यात डिझेलच्या दरात 19 वेळा वाढ झाली असून 11 रुपये 81 पैसे प्रतिलिटर प्रमाणे दर वाढले आहे.
दिवाळी भेट – डीझेल अडीच रुपये स्वस्त होणार
Date: