नवी दिल्ली : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, संजय आघाव आणि अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधीक्षक भगवंती मेश्राम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

