पुणे-परवा सांगितल्याप्रमाणे रुबी हॉल रुग्णालयातून आज दिलीप वळसे-पाटील यांना डिस्चार्ज देण्यात आला .
गेल्या 13 डिसेंबर रोजी वळसे-पाटील यांना कात्रज दुध संघातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर 7 दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, वळसे-पाटील यांच्या प्रकृतीची राज्यभरातून विचारणा करण्यात आली होती. आस्थेवाईकपणे विचारपूस करणा-या सर्वांचे वळसे-पाटील कुटुंबियांनी आभार मानले आहेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत आराम केल्यानंतर कामांना पूर्ववत सुरूवात करण्याचा मनोदय वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.