पिंपरी – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दिलीप खैरे यांनी नुकतीच पिंपरी शगुन चौक येथील फुलबाजाराला भेट दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड फुल संघटनेचे अध्यक्ष राजू मोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पिंपरी चिंचवड उपबाजार समितीची प्रमुख आर. एस. शिंदे, फुल संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी सस्ते, ज्ञानेश्वर केमसे, संतोष जाधव, संतोष फुले, दत्ता ठाकर, लता मांडगे, मीना आहेर आदी व्यापारी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड फुल संघटनेचे अध्यक्ष राजू मोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पिंपरी चिंचवड उपबाजार समितीची प्रमुख आर. एस. शिंदे, फुल संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी सस्ते, ज्ञानेश्वर केमसे, संतोष जाधव, संतोष फुले, दत्ता ठाकर, लता मांडगे, मीना आहेर आदी व्यापारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीप खैरे म्हणाले की, पिंपरीतील फुल आडत व्यापार्यांच्या गाळ्यांचा प्रश्न आपण लवकरच सोडवू, त्यासाठी काही जागा दृष्टीपथात असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. आज येथील व्यापार्यांना आपली दुकाने ही रस्त्यावर मांडवी लागतात. त्यामुळे अनेक समस्या त्यांच्यासमोर आहेत याची आम्हांला जाणीव आहे. ते बाजार समितीचा सेस भरत असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यावर आम्ही प्रामुख्याने भर देणार आहे. जेणे करून येथील व्यापारी हे दिवसभर आपला धंदा चालू ठेवू शकतील. आणि याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
पिंपरी येथे एकूण 18 ते 20 फुलांचे आडत व्यापारी असून ते अनेक वर्षापासून पिंपरी शगुन चौक येथे आपला धंदा हा रस्त्यावरच करत आहेत. या अगोदर अनेक वेळा या व्यापार्यांनी बाजार समितीकडे गाळ्यासंदर्भात मागणी सुध्दा केली. मात्र आजपर्यंत त्यांची ही मागणी पुर्ण होऊ शकली नाही. मात्र खैरे यांनी बाजार समितीचे सुत्र आपल्या हातात घेतल्यानंतर आता त्यांनी स्वतःहुन पुढाकार घेऊन पिंपरी येथील फुल आडत व्यापार्यांना गाळा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी आज पर्यंत 3 ते 4 वेळा या बाजाराला भेट देवून व्यापार्यांबरोबर चर्चा करून जागेची पहाणी देखिल केली आहे. नुकतेच पुण्यात अद्ययावत फुल बाजाराच्या इमारतीचे उद्घाटन झाले. त्यामुळे खैरे हे पुण्याप्रमाणेच पिंपरी येथील फुल बाजाराच्या गाळ्यांच्या प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा या फुल व्यापार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


