मुंबई – बाजीराव मस्तानी पेक्षा कमी प्रसिद्धी आणि कमी मार्केटिंग करूनही दिलवाले या चित्रपटाने ‘बाजीराव ‘ ला मागे टाकले आहे गेल्या दोन दिवसात म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी दिलवालेने बॉक्स ऑफिस वर ४१ कोटी ९लाख रुपये मिळविले तर बाजीराव ने २८ कोटी ३२ लाख रुपये मिळविले . बाजीराव ला झालेला विरोध हा बाजीरावची पीछेहाट होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते . संजय लीला भन्साळी यांना हा मोठा धक्का असणार आहे . शाहरुख आणि काजोल हि जोडी आताच्या तरुणाईला मानवेल काय ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते , रणवीर सिंह आणि दीपिका- प्रियांका या बॉलीवूड मधील तरुणाईला देखील काजोल आणि शाहरुख ची आज हि एवढी लोकप्रियता असल्याचे दिसून आले आहे .
‘दिलवाले’ने कमविले ४१ कोटी तर ‘बाजीराव’ २८ कोटीवर …२ दिवसांची कमाई
Date:

