पुणे-सनईचौघड्याचे वादन, क्षणाक्षणाला दिली जाणारी तुतारीची सलामी लहानांपासुन थोरापर्यंतीची दिप प्रज्वलित करण्याची लगबघ, श्री शिवछत्रपतींचा होणारा जयघोष अशा शिवमय वातावरणात शिवजयंती महोत्सव समिती तर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज दिपोत्सव २0१४ पर्व ३ रे अंतर्गत एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला आठसहस्त्र पारंपरिक दिव्यांची भव्य मानवंदना देण्यात आली.
दिपोत्सवाचे उद्घाटन महापौर दत्तात्रय धनकवडे, जयंत पवार, आमदार विजय काळे, नगरसेवक विशाल तांबे, बाळासाहेब बोडके, बाळासाहेब लांडगे, प्रताप परदेशी तसेच शिवजयंती मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पासलकर, जेधे, बांदल, कंक, मालुसरे, पायगुडे, कोंडे, ढमढेरे, सणस, शिळीमकर, निवंगुणे, करंजावणे, कडु, धुमाळ, काकडे, मोहिते यांच्या वंशजांकडुन दिप प्रज्वलित करून करण्यात आले. पुतळ्याचे वजन तब्बल ८000 किलो असल्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशी ८000 पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली. पुणोकरांनी काही क्षणातच ८000 पणत्या प्रज्वलित केल्यामुळे संपुर्ण परिसर प्रकाशमान झाला. शिवछत्रपतींचा भव्य अश्वारूढ एकसंघ कास्टींग केलेला हा जगातील एकमेव पुतळा आहे. पुतळ्याला ८६ वर्षे पुर्ण झाली आहेत. शिवछत्रपतींना ८000 पणत्यांची मानवंदना देणारा हा भारतातील एकमेव उपक्रम आहे. दिपोत्सवाला महिला व लहान मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दिपोत्सवाच्या यशस्वी नियोजनामध्ये समितीच्या सदस्यां बरोबर असंख्य पुणोकरांचा यशस्वी वाटा दिसुन आला. पाडवा दिपोत्सव, शिवजन्मोत्सव सोहळा मिरवणूक, शिवराजाभिषेक सोहळा या दिनी श्री शिवछत्रपतींना भव्य मानवंदना देण्याची समितीने यशस्वी प्रथा पाडल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, दत्ता पासलकर, दिपक घुले, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, रवी कंक, किरण देसाई, राजाभाऊ पासलकर,रणजीत शिंदे, निलेश जेधे, गिरीश गायकवाड व सर्व सदस्यांनी दिली.