Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दारूची नशा आयुष्याची दुर्दशा – शटर

Date:

(सिने समीक्षण आणि ट्रेलर देखील  )

निर्मिर्ती : सिलिकॉन मिडिया ट्रेंड्स अँडफिल्म मेकर्स प्रा. लि.

दिग्दर्शन : व्ही. के. प्रकाश

मूळ कथा : जॉन मॅथ्यू

पटकथा – संवाद : मनीषा कोरडे

छायांकन : के. के. मनोज

संगीत : पंकज पडघन

कलाकार : सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी , अमेय वाघ, प्रकाश बरे, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, राधिका हर्षे, कौमुदी वालोकर आदी

. दर्जा – ४/५

सरकार मॅगी  वर बंदी घालते दारूवर का नाही ? असा प्रश्न हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना पडला असेल . दारूची नशा आणि आयुष्याची दुर्दशा  हि सरकारचीच बोध वाक्येही आठवतील सिलिकॉन मिडिया ट्रेंड्स अँडफिल्म मेकर्स प्रा. लि.ने   प्रदर्शित केलेला  ‘शटर’ हामल्याळममधील ‘शटर’ याच सुपरहिट चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. एका सुस्थितीतील चांगल्या कुटुंबातील , चांगले जीवन जगणाऱ्या मॅच्युयर्ड माणसाचे आयुष्य दारूच्या नशेत कसे उध्वस्त होवू शकते याची हलकीशी जाणीव करून देणारी हि कथा आहे
ही कथा एका रात्रीत सुरू होते आणि दुसर्‍या रात्री संपते. . एका सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात क्षणिक मोहापायी घडलेली ही घटना एका रात्रीपुरती र्मयादित असली तरी त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीवर पुरेसे भाष्य करणारी ठरली आहे.जितेंद्र ऊर्फ जित्याभाऊ हा जहाजावर काम करणारा कामगार तसा सुखवस्तू आहे. पत्नी आणि दोन मुली असा त्याचा छान संसार आहे. मात्र कॉलेजमध्ये जाणारी त्याची मुलगी सतत तिच्या मित्रपरिवाराबरोबर असते ही बाब त्याला खटकत असते म्हणून तो तिचे लवकर लग्न लावून द्यायच्या विचारात आहे. आपल्या बंगल्यासमोर त्याची भाड्याने दिलेली काही दुकाने आहेत. त्यातील एक दुकान बंद आहे. एक्या नावाचा रिक्षावाला तसेच एक ट्रकचालक आणि जित्याभाऊचे काही मित्र मिळून त्या बंद दुकानात एका रात्री दारूचीपार्टी करतात. दारू संपल्यानंतर जित्याभाऊचे इतर मित्र घरी जातात, मात्र जित्याभाऊला आणखी दारू पिण्याची हुक्की येते म्हणून तो एक्यासह त्याच्या रिक्षात बसून दारू आणायला मध्यरात्री बाहेर पडतो. वाटेत एका बसथांब्यावर त्याला एक वेश्या भेटते. तिला एक्याच्या मध्यस्थीने तो तिला घेऊन त्या बंद दुकानात येतो. त्या वेश्येला भूक लागलेली असते म्हणून एक्या खायला आणण्यासाठी दुकानाचे शटर बाहेरून कुलूप लावून बंद करतो आणि जातो. मात्र येताना पोलिसाच्या तावडीत सापडतो आणि त्याला रात्रभर पोलीस ठाण्यात मुक्काम करावा लागतो. इकडे त्याची वाट पाहून जित्याभाऊची तगमग सुरू होते आणि बंद शटर मध्ये अडकलेल्या जीत्याभावू ला बाहेरच्या जगात उघडपणे जी माणसे समजत नाहीत ती बंद शातारमध्ये अडकून पडल्यानंतर समजतात  आणि त्याला झाल्या गोष्टीचा पश्‍चाताप होतो. त्या बंद शटरमधून त्याची सुटका कशी होते हा अनुभव पडद्यावर पाहण्यासारखाच आहे.
या कथेत एक लेखक-दिग्दर्शकही आहे. त्याची महत्त्वाची बॅग एक्याच्या रिक्षात विसरलेली असते. म्हणून तोही या कथेतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जित्याभाऊ, एक्या, ती स्त्री आणि हा लेखक यांच्याभोवतीच ही एका रात्रीची कथा फिरत राहते. या कथेच्या अनुषंगाने असलेले, जित्याभाऊचे शेजारच्या गॅरेजवाल्याशी झालेले भांडण, तसेच बंद दुकानावरून त्याचा, त्याच्या सख्ख्या मेहुण्याशी झालेला वाद आणि दुकानाचा ताबा घेण्यासाठी मेहुण्याचे त्याचवेळी पोलिसांना घेऊन येणे आदी काही प्रसंग कथेची चांगली उत्कंठा वाढविणारे ठरले आहेत. कथेचा शेवट धक्कादायक असला तरी जित्याभाऊबरोबरच इतरांनाही विचार करायला लावणारा आहे. सचिन खेडेकरने जित्याभाऊ ग्रेटच  रंगविला आहे. सोनाली कुलकर्णी  हिनेही  शरीरविक्रय करणार्‍या स्त्रीची भूमिका उत्तम पार पाडली आहे. दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश बरे यांनी लेखक-दिग्दर्शकाची भूमिका  केली आहे. मात्र सर्वाधिक लक्षात राहतो तो अमेय वाघ याचा एक्या रिक्षावाला. रिक्षावाल्याची भूमिका तो अक्षरश: जगला आहे, असेच म्हणावे लागेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...