कान्हे फाटा येथे निसर्गरम्य परिसरात साकारलेला भव्य प्रकल्प
पुणे, दि. २४ सप्टे : ‘अनंतसृष्टीच्या पहिल्या (फेज १) आणि दुसऱ्या टप्प्याच्या (फेज २) यशस्वीतेनंतर ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’तर्फे ‘अनंतसृष्टी’च्या तिसऱ्या (फेज ३) टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. कान्हे फाटा परिसरातील निसर्गरम्य वातावरणामध्ये, ३५ एकरच्या परिसरामध्ये वसलेल्या फेज ३ प्रकल्पाचा शुभारंभ येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. यावेळी फ़्लॅट बूक करणाऱ्यांना स्व. दाजीकाका गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’तर्फे १ लाख रुपयांपर्यंतचे ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’चे वाऊचर भेट म्हणून देण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’ तसेच ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ हे उपस्थित राहणार आहेत, ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’च्या संचालिका वैशाली गाडगीळ, ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’च्या संचालिका राधिका गाडगीळ, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल ताविलदार व प्रसिद्ध बांधकाम विषयक लेखक आणि ब्लॉगर रवी करंदीकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने कान्हे फाटा येथे २७ आणि २८ सप्टेंबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. अनंतसृष्टीच्या या प्रकल्पास भेट देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’च्या मॉडेल कॉलनी येथील कार्यालयातून, खास वाहन व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याठिकाणी निसर्गरम्य परिसराच्या अनुभवाबरोबरच सँपल फ़्लॅट, शो फ़्लॅट व प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे.
प्रमुख माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या, अनेक महत्त्वपूर्ण उत्पादन उद्योग व नामवंत शैक्षणिक संस्था असणाऱ्या तळेगाव-कान्हे फाटा भागामध्ये निसर्गाच्या सहवासात ‘अनंतसृष्टी’ हा प्रकल्प वसलेला आहे. क्लब हाउस, प्रशस्त मोकळी जागा आणि पुणे-मुंबई महामार्गाशी कनेक्टीव्हिटी हे अनंतसृष्टीचे वेगळेपण आहे. आजूबाजूला रुंद व मोकळे रस्ते आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असा ‘अनंतसृष्टी’ प्रकल्प गुंतवणूकदारांसाठीसुद्धा एक सुवर्णसंधी आहे. थोडक्यात, ‘अनंतसृष्टी म्हणजे निसर्ग व अत्याधुनिक सुखसोयी यांचा सुंदर मिलाफ आहे.