राष्ट्रवादी+काँग्रेस+मनसे = स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम पुणे महापालिकेचा नवा ‘पॅटर्न’
पुणे-राज्यातील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करून राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्या गळ्यात स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ अगदी सन्मानाने घातली . पुण्याच्या दक्षिण भागात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वाढता प्रभाव पाहून त्याच नेत्यांमध्ये आपसात स्पर्धा लावून देण्याचे हे राजकारण आहे कि
परंतु, नाशिकच्या स्थायी समितीचा विचार करूनच त्यांनी ही बेगमी केली आहे याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत . त्यांच्या तीन मतांनी अश्विनी कदम यांचा विजय सोपा केला. महापौर -सभागृहनेते आणि आता स्थायीसामिती अध्यक्ष असे ३ पदाधिकारी पुण्याच्या दक्षिण भागाचे प्रतिनिधित्व करणारे असून तिघेही राष्ट्रवादी चे आहेत .
पुणे महानगरपालिका ही वेगवेगळ्या ‘पॅटर्न’साठी ओळखली जाते. राज्याच्या राजकारणाला नवनवे ‘पॅटर्न’ देणाऱ्या पुणे महानगरपालिकेत आज आणखी एक पॅटर्न अस्तित्वात आला आहे. राष्ट्रवादीला काँग्रेससोबतच मनसेनंही पाठिंबा देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांचा १२ विरुद्ध चार मतांनी पराभव केला. स्थायी समिती सभापतीपदी निवडल्या गेलेल्या कदम या तिसऱ्या महिला आहेत. त्यांना मिळालेल्या १२ मतांमध्ये तीन मतं मनसेची आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं स्वतंत्र उमेदवार दिल्यानं पुण्यातील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हं होती. परंतु, काँग्रेसचे चंद्रकांत ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि अश्विनी कदम यांचा विजय निश्चित झाला. कारण, राष्ट्रवादीची सहा आणि काँग्रेसची तीन मतं त्यांच्या पारड्यात पडणार होती. असं असतानाही, कितीतरी महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये तटस्थ राहणाऱ्या, मनसेच्या तीन सदस्यांनीही अश्विनी कदम यांनाच पाठिंबा दिला.