पणजी (गोवा)- मॉल मध्ये कपडे ट्राय करण्यासाठी असलेल्या चेंजिग रूम मध्ये छुपे कॅमेरे बसवून अनेक महिलांचे गोव्यात चित्रीकरण झाल्याच्या च ठिकाणी चक्क केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही खरेदी केली आणि त्या ‘त्या ‘चेन्जिग रूम मध्ये गेल्या . बापरे … पहा कुठे काय होवू शकते … पण दक्ष असलेल्या या मंत्री महिलेने येथे असलेला स्पाय कॅमेरा ओळखला आणि … तब्बल चार महिने येथे असे चित्रीकरण झाल्याचा प्रकार उघडकीस आणला .
त्याचे असे झाले । सध्या गोव्यात सुटीवर गेलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आज दुपारी त्या गोव्यातील कलंगूट बीचजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये गेल्या असता त्यांना एक चेंजिंग रूममध्ये स्पाय कॅमेरा असल्याचे आढळून आले. हा मॉल फॅब इंडिया कंपनीचा आहे. या घटनेनंतर इराणींनी स्थानिक आमदार मायकल लोबो यांना बोलवून घटनेची माहिती दिली. लोबो यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लागून सुट्ट्या आल्याने केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी कटुंबियांसह गोव्यात सुटी घालवायला आल्या आहेत. आज दुपारी फॅब इंडियाच्या कलंगूट येथील शॉपिंग मॉलमध्ये त्या खरेदीला गेल्या होत्या. मॉलमध्ये त्यांनी काही कपडे खरेदी केले. चेंजिंग रूममध्ये त्या गेल्या असता तेथे त्यांना एक स्पाय कॅमेरा आढळून आला. त्यानंतर त्यांनी पती झुबेन इराणींना माहिती दिली व तो कॅमेरा ताब्यात घेतला. इराणींनी स्थानिक आमदार मायकल लोबो यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर लोबोनी कलंगूट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, हा स्पाय कॅमेरा मॅनेजरच्या केबिनमधील संगणकाला जोडलेला होता. तो संगणक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या संगणकात गेल्या चार महिन्यापासूनच्या क्लिप सापडल्या आहेत. पोलिसांनी ट्रायल रूममधील सर्व फुटेज ताब्यात घेतले आहे, असे लोबो यांनी सांगितले.