पुणे
उद्योजकतेला वाव देताना सरकारने आपल्या जबाबदाऱ्या चे सुलभीकरण करावे ,हस्तक्षेप कमी करून धोरण ठरवावे ,त्यामुळे रोजगार वाढेल ,संपत्ती निर्मिती होईल ,योजनांची नीट अंमलबजावणी होईल आणि त्यातून नागरिकांना कर देणे सोपे होईल ,मात्र त्यासाठी प्रामाणिक राजकारणी आणि नोकरशाहीची गरज आहे ‘असे प्रतिपादन इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आज केले
पुण्यभूषण फौन्डेशन (त्रिदल )च्या वतीने आज २६ वा पुण्यभूषण सन्मान सिरम इंस्तीत्युत चे संस्थापक डॉ सायरस पूनावाला यांना नारायण मूर्ती ,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला ,त्यावेळी नारायणमूर्ती बोलत होते
इतरांना जे दिसत नाही ते उद्योजकांना दिसते ,त्या कामातून जनतेच्या चेहऱ्यावर समाधान आणणे हे त्यांचे काम असते . सायरस पूनावाला यांनी ते केले आहे ‘ अशा शब्दात नारायण मूर्ती यांनी डॉ सायरस पूनावाला यांचा गौरव केला
सोन्याचा नांगर फिरवणारे शिवाजी महाराजांची पुरस्कार प्रतिकृती ,एक लाख रुपयांची थैली देवून सायरस पूनावाला यांचा बालगंधर्व रंगमंदिर येथे सन्मान करण्यात आला . अध्यक्षस्थानी डॉ रघुनाथ माशेलकर होते .डॉ सतीश देसाई , पिनाकल ग्रुप चे गजेंद्र पवार ,उप महापौर आबा बागुल व्यासपीठावर उपस्थित होते
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविद्यालयीन काळातील सायरस यांच्यासम्वेतच्या आठवणीना उजाळा दिला . ‘बालकांच्या रोग निवारणासाठी लसनिर्मिती करून समस्येला जागतिक उत्तर देण्याचे मोठे काम पूनावाला यांनी केले . जगात तीन पैकी दोन बालकांना सिरम ची लस उपयुक्त ठरते . नव्या पिढीच्या उभारणीसाठी हे योगदान महत्वाचे आहे.दातृत्व देखील दाखवले अशा कर्तुत्व वान व्यक्तींचा सन्मान करून पुण्यभूषण ने राज्य आणि देशात आदर्श निर्माण केला आहे ‘ अशेही ते म्हणाले
डॉरघुनाथ माशेलकर,सायरस पूनावाला यांनीही मनोगत व्यक्त केले
पुरस्काराची लाखाची रक्कम आणि त्यात पूनावाला यांच्या दहा लाखाची भर टाकून कष्टकरी महिलांच्या कल्याणासाठी हि रक्कम डॉ बाबा आढाव यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली
महापौर दत्ता धनकवडे यांनी प्रास्ताविक केले . डॉ संदीप बुटाला यांनी आभार मानले
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी व्ही डी ओ संदेशाद्वारे पूनावाला यांच्या कार्याचा गौरव केला
यावेळी पाच स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला . त्यात मधुकर फडणीस ,शांता रानडे ,गजाभाऊ पिंगळे ,देवीचंद राठोड ,एकनाथ कोठावदे यांचा समावेश होता
राहुल सोलापूरकर यांनी सूत्र संचालन केले