डॉ.विकास आमटे यांना ‘रोटरी एक्सलन्स अॅवॉर्ड’ , अण्णा हजारे यांच्या हस्ते 20 डिसेंबर रोजी प्रदान कार्यक्रम
पुणे :
‘रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग’चा ‘रोटरी सर्व्हिस एक्सलन्स रेकग्निशन अॅवॉर्ड’ डॉ. विकास आमटे यांना जाहीर झाले असून, रविवार दि.20 डिसेंबर रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
साने गुरूजी रूग्णालय, सर्व्हे नं.165, माळवाडी, हडपसर येथे दि. 20 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग’ चे अध्यक्ष अमित शाह यांनी दिली.
‘रोटरी डिस्ट्रिक्ट 3131’चे डि.जी.एन.अभय गाडगीळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया अभियानाचा समारोपही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी सन्मुन शहा (सचिव), प्रकल्प प्रमुख राकेश ओसवाल, मनोज घोडके उपस्थित राहणार आहेत.