पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम केंद्रातील कार्यरत प्रा.डॉ.बाळकृष्ण दामले यांना ‘बेस्ट रिसर्च पेपर अॅवार्ड-2015’ प्रदान करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले. यावेळी वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर, डॉ.प्र.चिं.शेजवलकर, डॉ.बाबासाहेब सांगळे, डॉ. व्ही.बी.गायकवाड, डॉ. संजय कप्तान, डॉ. श्रीपाद कडवेकर, डॉ. शरद कोलते, डॉ.मुकुंद अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात पार पडला.
‘पुणे विद्यापीठाचे अनेक परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करार होत असताना संशोधन, क्षमता विकसन आणि गुणवत्ता वाढीकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे’, असे प्रतिपादन यावेळी बोलताना कुलगुरूंनी केले.
‘जर्नल ऑफ कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट थॉट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या डॉ. दामले यांच्या ‘अद्यापनात चित्रपट आणि नाट्याचा उपयोग’ या विषयावरील संशोधनपर लेखास हा पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. संजय कप्तान हे सहलेखक आहेत. “ABEED’ जर्नलचे (Association for Business Education & Entrepreneurship Development’s Best Paper Award)संपादक डॉ.एस.व्हि.कडवेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

