‘डॉ.पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा 2015-16’मध्ये नीलम शिंदे आणि रोशन पांडे प्रथम
पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.)च्या वतीने आयोजित ‘डॉ.पतंगराव कदम राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व 2015-16’ स्पर्धेत नीलम शिंदे (रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी) आणि रोशन पांडे (भारती विद्यापीठाचे आय.एम.ई.डी महाविद्यालय) यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रथम क्रमांकास विभागून रूपये 15 हजार, द्वितीय क्रमांकास विभागून रूपये 10 हजार तर तृतीय क्रमांकास विभागून रूपये 7 हजार, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप होते.
ही स्पर्धा आयएमईडीमध्ये नुकतीच कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमच्या पदवी परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत देशातील विविध भागातील 84 महाविद्यालातील 120 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ड्रीम, बिलिव्ह अॅण्ड अॅक्ट’, ‘डिजीटल इंडिया’, ‘भारत -2020’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन शक्य आहे का?’, ‘महिला सबलीकरण’,‘योगाचे महत्व’, ‘ग्लोबल वार्मिंग व त्याचे परिणाम’, ‘स्किल इंडिया’, ‘रस्ता सुरक्षा-काळाची गरज’ हे या स्पर्धेचे विषय होते.
डॉ. सचिन वेर्णेकर (‘आयएमईडी’चे संचालक आणि भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
डॉ. जयंत ओक (व्यवसाय मार्गदर्शक), डॉ. किर्ती गुप्ता, डॉ. भारतभूषण संख्ये, श्री. खोपकर (व्यवस्थापक, बी.आय.एफ प्रा.लि.) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
डॉ. प्रमोद पवार, डॉ.एच.एम.पाडळीकर, सुजाता मुळीक, प्रा. ऋषिकेश भगत यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
स्पर्धेचा निकाल
1 प्रथम क्रमांक : अ) नीलम शिंदे (रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी)
ब) रोशन पांडे (भारती विद्यापीठाचे आय.एम.ई.डी महाविद्यालय)
2. द्वितीय क्रमांक: अ) किरण ठाकरे (एस.एस.जी.एम महाविद्यालय, कोपरगांव)
ब) अर्जुन नलावडे (पुणे विद्यापीठ)
3. तृतीय क्रमांक : अ) माधुरी निंबाळकर (पुणे विद्यापीठ)
ब) हर्षाली घुले (किलेचंद महाविद्यालय, नाशिक)