: डेंग्यू व होमिओपेथीबद्दल असलेले गैरसमज-
‘डेंग्यू’ वर होऊ शकतो त्वरित इलाज- डॉ. सोनवणे यांच्या औषधी मिश्रणामुळे रुग्णांना २ दिवसातच आराम
पुणे : डेंग्यूने सध्या सगळीकडेच थैमान मांडले आहे. सर्वसामान्यांपासून ते मोठमोठे सेलेब्रिटीसुद्धा डेंग्यूमुळे त्रस्त झाले आहेत. अनेक मोठ्या इस्पितळात यावर कमीतकमी ८ ते १० दिवस उपचार दिला जातो. तसेच काही इस्पितळामध्ये तर प्लेटलेट कमी झाल्यामुळे आयसीयु मध्ये भरती करून घेतात. परंतु डॉ. नयना सोनवणे यांनी होमीओपेथीमधील औषधांचे काही विशिष्ठ मिश्रण तयार केले आहे, ज्यामुळे रुग्णांचे अवघ्या १२ ते १६ तासातच ताप पूर्णपणे बरा होतो. पुढील एक दोन दिवसात अशक्तपण कमी होतो व प्लेटलेटची संख्या अवघ्या काही तासातच नॉर्मल होतात आणि कुठले साईड इफेक्टदेखील होत नाही.
गेल्या २३ वर्षांपासून डॉ. नयना सोनवणे ह्या होमीओपेथीमध्ये प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांच्याकडे विविध रोगांनी त्रस्त असलेले रुग्ण या काही वर्षांमध्ये उपचारासाठी आले आहेत. गेल्या वर्षभरात जवळजवळ २५ – ३० डेंग्यूमुळे त्रस्त असलेले रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी आले आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा घेत, डॉ. सोनवणे यांनी डेंग्यूसाठी दोन वर्ष सतत अभ्यास करून उपलब्ध औषधी वापरूनच एक विशिष्ठ मिश्रण तयार केले आहे. या औषधामुळे हे सर्व रुग्ण जास्तीत जास्त २ ते ३ दिवसातच पूर्णपणे बरे झाले आहेत.
“माझ्याकडे आतापर्यंत डेंग्यूचे व त्याप्रमाणे लक्षणे असलेले अनेक रुग्ण आले. हे सर्व रुग्ण ‘डेंग्यू’ या नावामुळेच घाबरलेले असतात परंतु मला एव्हडेच सांगायचे आहे की हा आजार गंभीर नाही. यावर योग्य तो इलाज चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तसेच वेळेत होऊ शकतो. यामुळे नुसते डेंग्यूचे नाव ऐकून घाबरून जाऊ नका.” असे आवाहन डॉ.सोनवणे यांनी यावेळी केले. तसेच, ” पुणे, मुंबई व दिल्लीमधील रुग्णही हे औषध घेतल्यावर अगदी २ दिवसातच बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे आयसीयु मध्ये भरती असलेले व डेंग्यूमुळे प्लेटलेटची संख्या निम्म्याहून कमी झालेले रुग्णदेखील हे औषध घेऊन आवघ्या तीन दिवसात बरे झाले आहेत.” अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.
“माझा मुलगा आर्यन याला गेल्या वर्षी शाळेतच त्रास होऊ लागला. घरी आल्यावर तो पूर्णपणे गळाला होता. त्याचा ताप वाढत होता. त्याचे हात पायदेखील खूप दुखत होते. त्याला भूकही लागत नव्हती. हे सर्व लक्षणे डेंग्यूचे असल्यामुळे आम्ही डॉ. नयना सोनावणे यांना लगेच कळविले. त्यांनी त्याच दिवशी एक – एक तासाच्या अवधीने घेणारे औषध दिले. त्याचा १०४ असलेला ताप सकाळपर्यंत पूर्णपणे बारा झाला आणि भूकही लागली. तसेच तिसऱ्या दिवसपर्यंत प्लेटलेट्सदेखील वाढल्या. माझा मुलगा फुटबॉल खेळाडू आहे. त्यावेळी त्याचे ट्रेनिंग दिल्लीला होते. परंतु अगदी सहाव्या सातव्या दिवशी तो १० दिवसांच्या फूटबॉल ट्रेनिंगसाठी दिल्लीलाही गेला.” अशी भावना मंजुषा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे, ” माझ्या मोठ्या भावाचे लग्न जवळ आले होते. मी लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो. परंतु अचानक मला ताप चढला. खोकला, मळमळणे इत्यादी प्रकार वाढू लागले. मी फिसिशियनकडे गेल्यावर त्यांनी मला डेंग्यूची टेस्ट करण्यास सांगितले, नेमकी ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी, माझी आई, माझे नातेवाईक सगळेच घाबरून गेलो होतो. माझ्या प्लेटलेट्स देखील कमी झाल्या होत्या. डॉक्टरांनी तसेच काही नातेवाईकांनी मला इस्पितळात भरती करण्याचा सल्लादेखील दिला होता.” अशी काळजी श्रीपाद जाधव यांनी त्यावेळी व्यक्त केली. तसेच “माझ्या आईला कोणीतरी डॉ. सोनावणे यांची माहिती दिली आणि तिने लगेच त्यांना माझ्याबद्दल कळविले. डॉ. सोनावणे यांनी माझ्यावर रात्रीतूनच माझ्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. एक एक तासाच्या अवधीने औषध दिल्यावर मला एका दिवसातच बरे वाटू लागले व मी दोन दिवसात माझ्या भावाच्या लग्नाची खरेदी करायला बाहेरही पडलो.” असा आनंद श्रीपाद जाधव यांनी व्यक्त केला.
: डेंग्यूची लक्षणे व त्याची घ्यावयाची काळजी
थंडी, ताप, डोके दुखी, सांधे व अंगदुखी, त्वचेवर पुरळ आणि अशक्तपणा ही काही लक्षणे डेंग्यू झालेल्या रुग्णामध्ये दिसून येतात. पाथोलोजिकल तपासणीमध्ये एनएस पॉझिटिव्ह येते. प्लेटलेटची संख्या कमी होते. परंतु काही रुग्णामध्ये या सर्वच गोष्टी आढळून येतील असे नाही. डेंग्यू हा रोग झालेल्या रुग्णाला घरीच सातत्याने या औषधांसोबत साखरेचे पाणी, खजूर व पेज देत राहा ज्यामुळे रुग्णाचा अशक्तपण कमी होईल. तसेच आराम व पुष्कळशी झोप हेदेखील आजार झाल्यावर महत्वाचे आहे. डेंग्यू ताप आढळलयास रुग्णास कुठलेही घरगुती व इतर औषध देऊ नयेत त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा रुग्णाला कोमट पाण्याने स्पोंजिंग करीत राहिल्याने त्याचा ताप उतरतो.
“डेंग्यू हा गंभीर आजार आहे असे लोकांना वाटते परंतु हा काही गंभीर आजार नाही. तसेच याबद्दल अनेकांना असे वाटते की व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो. पण हा आजार ‘एडेस’ जातीच्या डासाची मादीमध्ये डेंग्यू व्हायरसचा संसर्ग आहे ती चावल्याने होतो. तसेच होमिओपेथीमध्ये काही रोगांवर इलाज नाही व होमिओपेथी वेळखाऊ असल्याचे अनेकांना वाटते परंतु ते साफ चुकीचे आहे. याउलट होमिओपेथीमध्ये त्वरित व दुष्परीणाम व्यतिरिक्त इलाज होतो. तसेच या उपचारामध्ये खर्चही कमीत कमी होतो.” असे डॉ. सोनवणे यांचे म्हणणे आहे.