
पुणे :- वैशिष्ट्यपूर्ण गृहप्रकल्पांद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सतर्फे सादर झालेल्या ‘डीएसके मास्टर प्लॅन‘ या योजनेला केवळ पुण्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून तसेच परदेशातूनही उदंड प्रतिसाद मिळत आहे.
मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रदर्शनाला राज्यातील औरंगाबाद, लातूर, जळगाव, नाशिकपासून अगदी नागपूरमधील तसेच परराज्यातील ग्राहकांनी आवर्जून भेट देत आपल्या स्वप्नातील घराचे बुकींग केले. विशेष म्हणजे ऑनलाइन योजनेला जपान, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. खासगी कंपन्या, सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी आणि अधिका-य़ांनी या वेळी भेट दिली.
अशाच योजनांमार्फत उत्तमोत्तम गृहप्रकल्प लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. ग्राहकांनी दिलेल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सच्या अध्यक्षा हेमंती कुलकर्णी यांनी ग्राहकांचे आभार मानले.
माझी नोकरी मुंबईत झाली. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात होतो. येथेच स्थायिक व्हायचे हे नक्की होते. त्यातही डीएसकेंकडे घर घ्यायचे हे ठरविले होते. त्यानुसार येथे घर बुक केल्याचे माजी सरकारी अधिकारी कुमारसाहेब साळुंके यांनी सांगितले. तर डीएसके डेव्हलपर्सच्या व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यात हि उत्कृष्ट योजना यामुळे आम्ही येथे फ्लॅट्स घेण्याचे नक्की केले. निसर्ग सौंदर्य, प्रदूषणविरहित वातावरण व वाढत्या शहरीकरणाचा विचार करून त्यांनी या प्रकल्पाची केलेली रचना खूप आवडली, असे संकेत पारेकर यांनी सांगितले.

