पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स यांच्या पिरंगुट येथे साकारण्यात येणाऱ्या डीएसके चैत्रबन आणि पुष्पबन गृहप्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा काल मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. यावेळी डीएसके परिवाराच्या प्रथेनुसार चैत्रबन आणि पुष्पबन या गृहप्रकल्पात नोंदणी केलेल्या सदनिकाधारकांच्याच हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन पार पडल्यावर समाधानाची भावना प्रत्येक कुटुंबाच्या चेहेऱ्यावर दिसून येत होती. यावेळी समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी,हेमंती कुलकर्णी यांच्यासह डीएसके समूहाचे पदाधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी कुलकर्णी म्हणाले की, बांधकाम साहित्याच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती , सरकारतर्फे आकारण्यात येणारे विविध कर यामुळे शहरातील जमिनीचे भाव कडाडले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्यमवर्गीय ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून योग्य दरात दर्जेदार सदनिका देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कम्युनिटी हॉल, जिम्नैशियम, क्लब हाऊस, पार्टी लॉंन्स, चिल्ड्रन प्ले एरिया, सुशोभित लैन्डस्केपिंग आदी सोयींनी युक्त असे हे दोन गृहप्रकल्प आहेत.
सदनिकाधारकांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या प्रथेबाबत ते म्हणाले की, स्वत: च्या घराचे भूमिपूजन करण्याची संधी सदनिकाधारकांनाच मिळाल्याचा आनंद नेहमीच आम्हाला लाभत आला आहे. भूमिपूजन झाल्यावर लगेचच कामाला सुरुवात करणे आणि त्याच दिवशी ग्राहकांना घराचा ताबा देण्याची तारीख सांगणे हे आमचे वैशिष्टय आहे. यानुसार मे २०१८ ला पुष्पबन आणि चैत्रबनच्या ग्राहकांना घर सुपूर्त करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
निसर्गाचा भरभरून वरदहस्त लाभलेला, हिरवाईने नटलेलला शांत व रम्य परिसर हे या प्रकल्पांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. चैत्रबन आणि पुष्पबन मध्ये १२ मजली २ इमारती आहेत त्यात प्रशस्त १ व २ बीएचके फ्लॅटची रचना करण्यात आली आहे. याच्याच जोडीला मयुरबन आणि नंदनवन या प्रकल्पांचे कामही प्रगतीपथावर आहे.
मागच्या महिन्यात फ्लॅट बुकिंगला सुरुवात झाली आणि अल्पावधीत त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला. केवळ पुण्यातूनच नव्हे तर मुंबई, सातारा, ठाणे,सोलापूर यांसह राज्यातील इतर शहरातील ग्राहकांनी येथे नोंदणी केली. आगामी काळात येणाऱ्या आमच्या गृहप्रकल्पांनाही नागरिकांचा असाच भरभरून प्रतिसाद लाभेल असा विश्वासही हेमंती कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.