पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स यांच्या ३ नव्या गृहप्रकल्पाच्या शुभारंभानिमित्त दि. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत पुण्यातील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर ‘डीएसकेज् मास्टर प्लॅन’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात डीएसके शैलीतले ३ नवे प्रिमियम गृहप्रकल्प सादर करण्यात आले आहेत. आधुनिकता, तंत्रज्ञान आणि सुखसुविधा अशा सर्वच बाबतीत हे तीनही गृहप्रकल्प अव्वल श्रेणीचे आहेत. नव्या गृहप्रकल्पांचा शुभारंभ करताना ग्राहकांच्या फायद्याची वैशिष्ठ्यपूर्ण योजनाही सादर करणे ही डीएसकेंची परंपरा आहे. याच परंपरेला अनुसरून या प्रदर्शनातही ग्राहकांना फक्त सव्वा आठ वर्षात कर्जमुक्ती करणारी एक अभिनव कर्ज योजना सदर करण्यात आली आहे. या प्रदर्शनात घर बुक करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेत येईल. आतापर्यंत कुणीही दिलेली नसेल अशी हि अद्वितीय योजना असून या योजनेमुळे घर घेताना ग्राहकांवरील कर्जाचा भार अतिशय हलका होणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन डी. एस. कुलकर्णी डेव्हपर्सच्या संचालिका सौ. हेमंती कुलकर्णी यांनी केले आहे.