‘डि.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’ पिंपरी, पुणे आणि एस पी कॉलेज मध्ये ‘डायल 108’ रुग्णवाहिका सेवा जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’सेवेच्या जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होतेे.
डायल 108 सेवेबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणे या प्रमुख हेतूने ‘डि.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’ पिंपरी, पुणे आणि सर परशूराम महाविद्यालय (एस पी कॉलेज) येथे आयोजित या अभियानाअंतर्गत एकूण तीनशे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे ‘डायल 108’ सेवेच्या कार्याची माहिती देण्यात आली.
या जनजागृती प्रात्यक्षिकाचे संयोजन डॉ. विनय यादव (विभागीय व्यवस्थापक), साहेबराव इंगळे (जनजागृती विभागप्रमुख), अतुल फडतरे (सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक), दीपक पवार (निरीक्षक), डॉ.प्रविण साधले (इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटरचे व्यवस्थापक), डॉ. भूषण सोमवंशी (जिल्हा व्यवस्थापक), राहुल गांधले (सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक) यांनी केले होते.
‘डि.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’, पिंपरी, पुणे येथे ‘डायल 108’ सेवेच्या जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एम.डी.मोहिते, मनिषा पवार, अर्जुन काळे, प्राध्यापक वर्ग आणि 100 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच सर परशूराम महाविद्यालय (एस पी कॉलेज) येथे ‘डायल 108’ सेवेच्या जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दीलीप शेठ, डॉ. विलास उगळे (एनएसएस विभाग प्रमुख), मंगेश चव्हाण, कुणाल चोरमले, किरण आंधळे आणि 200 ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एन एस एस) चे विद्यार्थी उपस्थित होते.
‘डायल 108’ सेवेबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणे या प्रमुख हेतूने या प्रात्यक्षिक सादरीकरणाचे आयोजन आले होते. यामध्ये ‘डायल 108 रूग्णवाहिका सेवेत या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अशाप्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये 233 ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका समाविष्ट आहेत. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’ याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.