नवी दिल्ली – पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. लिटर मागे 3.37 रुपये दरकपात करण्यात आली आहे. डिझेलचे दर आता तेल कंपन्याच ठरविणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज शनिवारी झालेल्या बैठकीत डिझेलच्या किंमती सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर घरगुती वापराच्या गॅसचे अनुदान पुन्हा थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. पेट्रोलनंतर आता डिझेल किंमतीवरील सरकारी नियंत्रण उठविण्यात आले आहे. त्याच बरोबर गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी गॅस दर निश्चित करण्यात आले आहे. ५.६१ प्रति युनिट असे नवीन गॅस दर निश्चित करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ८.२ डॉलर प्रति युनिटचे दर देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने ती फेटाळून लावली असल्याचे दिसते. नवीन गॅसचे दर १ नोव्हेंबरपासून लागू होतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
डिझेलच्या दरात 3.37 रुपये कपात
Date: