पुणे, – नायजेरियातील डामिलोला एकेरवूसी आणि त्यांच्या पतीने अनेक वर्षे संततीसाठी अनेक प्रयत्न केले…अनेक उपचार करून पाहिले, अगदी अमेरिकेतही उपचार झाले…पण निराशाच पदरी आली. मात्र या दांपत्याचे स्वतःच्या बाळाचे स्वप्न साकार होतेय ते पुण्यात– रुबी हॉल क्लिनिकच्या प्रयत्नांमुळे. ती रुबी हॉल मधील परदेशी रुग्णांपैकी ३०० वी यशस्वी आयव्हीएफ उपचार घेणारी माता ठरली आहे. तसेच रुबी हॉल आता परदेशी रुग्णांसाठीही आशेचे किरण बनले आहे.
आज ३६ वर्षांच्या असलेल्या डामिलोला या कृतज्ञतेने सांगतात, “आम्ही जवळ जवळ सात वर्ष स्वतःचे मुल होण्याकरिता प्रयत्नशील होतो. आमच्या जीवनातील तो अत्यंत कठीण काळ होता. अगदी न्यूयॉर्कमध्येही उपचार करून पाहिले परंतु ते अपयशी ठरले. कोणीतरी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही इथे आलो व आज माझं स्वप्न पूर्ण होतंय.”
रुबी हॉलमधील आयव्हीएफ आणि इंडोस्कोपी केंद्र प्रमुख डॉ. सुनिता तांदूळवाडकर यांनी डामिलोलाच्या तपासण्या करून त्यांना एंड्रिमेट्रियोसिस असल्याचे निदान केले. गर्भाशयाच्या अस्तराशी संबंधित हा आजार जगातील दर दहापैकी एका महिलेला होतो आणि त्यामुळे प्राणदायक वेदना तसेच वंध्यत्व येऊ शकते. त्यामुळे गर्भधारणा होण्यात अनेक अडचणी येतात आणि अनेक महिलांचे मातृत्वाचे स्वप्न या आजारामुळे अपूर्णच राहते.
“एंड्रिमेट्रियोसिसचे निदान झाल्यानंतर तिला आयव्हीएफ उपचार घेण्यासाठी सल्ला देण्यात आला, ज्यामध्ये स्त्रीच्या ओटीपोटी बाहेरील वातावरणात अंडी व शुक्राणूंचा संयोग घडवून आणला जातो व एम्ब्रियो तयार केला जातो. त्यानंतर तिच्या एंड्रिमेट्रियोसिस आजारावर औषधोपचार करण्यात आले. हा आजार बरा झाल्यावर बाहेरील वातावरणात वाढविलेला एम्ब्रियो तिच्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आला. आज ती सात आठवड्यांची गर्भवती आहे.” अशी माहिती डॉ. तांदूळवाडकर यांनी दिली.
“प्रत्येक दाम्पत्याचे स्वतःची संतती असावी, हे स्वप्न असते आणि ते त्या स्वप्नांपासून वंचित राहू नयेत, असे आम्हाला वाटते. डामिलोला ही रुबी हॉलमधील ३००वी यशस्वी आयव्हीएफ उपचार घेणारी परदेशी नागरिक ठरल्याचा आम्हाला आनंद होत आहे. रुबी हॉलमध्ये अत्याधुनिक यंत्रणा, अनुभवी डॉक्टर्स,तंत्रज्ञ आणि प्रशिक्षित नर्सेस असल्यामुळे गंभीर केसेस सुद्धा चांगल्या रीतीने हाताळता येतात. त्याचा चांगला परिणाम रुग्णाना दिसून येतो व रुग्ण समाधानी होऊनच येथून बाहेर पडतो. येथील जागतिक दर्जाच्या सोई आणि किफायतशीर उपचार, यांमुळे जगभरातील रुग्णांचे हे पसंतीचे ठिकाण बनले आहे,” असे रुबी हॉल क्लिनिकचे कार्यकारी अधिकारी बोमी भोटे म्हणाले.
आपल्या भावना व्यक्त करताना डोमिलोला म्हणाल्या, “गेल्या आठवड्यात आम्ही पहिल्यांदा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. येथील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला जो आनंद दिला आहे, त्याची पैशात गणना करता येणार नाही.”