Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

टाटा उद्योगसमूहाच्या ट्रेंट लिमिटेडचा एक भाग असणाऱ्या वेस्टसाईडचे भारतातील १८६ वे दालन सुरु.

Date:

पुणे: आदर्श भारतीय उद्योगसमूह असणाऱ्या टाटा कुटुंबाचा एक भाग असणाऱ्या वेस्टसाईडने पुण्यातल्या वेगाने विकसीत होत असलेल्या हिंजवडी उपनगरात अलिकडेच नवे कोरे करकरीत दालन सुरु करत पुण्यातील फॅशन प्रेमींसाठी खास पर्वणी आणली आहे. प्रत्येक क्षणासाठी फॅशन शैली सोपी, सुलभ करत वेस्टसाईडने कामापासून आठवड्याच्या सुट्टी पर्यंत आणि ते लाऊंजपर्यंत अशा वेगवेगळ्या क्षणांसाठी परिपूर्ण वॉर्डरोब पर्याय आणले आहेत. फॅशन आणि मूल्य यात विश्वासार्हता आणणाऱ्या या नव्या दालनात कपडे, अॅक्सेसरीज, सौंदर्यप्रसाधने आणि पादत्राणे अशा सगळ्या गोष्टी एका छताखाली मिळणार आहेत!

या नव्याने सुरु झालेल्या दालनात वेस्टसाईडच्या परंपरेशी सुसंगत आधुनिक आणि समकालीन फॅशन ब्रँड अत्यंत योग्य दरात असून त्यामुळे ग्राहकांना एकमेवाद्वितीय आणि अतुलनीय खरेदीचा अनुभव मिळू शकेल. आपल्या कलेक्शनच्या माध्यमातून वेस्टसाईड दर शुक्रवारी फॅशन मध्ये नाविन्यता आणते. १२,६०० चौरस फूट भागात पसरलेले हे आधुनिक दालन उत्तम व्यवस्था, गोंधळमुक्त वातावरण आणि सध्या चालू असलेले प्रवाह ठळकपणे दर्शविणारे डिस्प्ले यातून शॉपिंग वातावरण खुलवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

समस्त महिलावर्गाने सर्वोत्तम किंमतीला आवडत्या फॅशनच्या वस्तू आपल्या हातात याव्यात यासाठी तयार व्हावे! फॅशन बाबत उत्साही असणाऱ्या आणि पार्टीचा आकर्षण बिंदू बनण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व तरुण मुलींसाठी नूओन आहे. हा ब्रँड सोशल मिडिया पिढीचे प्रतिनिधित्व करतो. आकर्षक आणि नाजूक कपड्यांच्या शोधात तुम्ही आहात का? मग इकडे तिकडे शोधत फिरू नका कारण एल.ओ.व्ही.हे कोणत्याही सुंदर आणि आकर्षक कपड्यांसाठीचे उत्तर आहे. सगळ्या कर्व्ही स्त्रियांसाठी जियाचे कलेक्शन एकदम सुंदर, आकर्षक आणि आरामदायी आहे. वॉर्डरोब, ९ ते ९ फॅशन हे कामाच्या ठिकाणी वापरायच्या स्टायलिश, प्रभावी, सुसंस्कृत आणि आत्मविश्वासपूर्ण कपड्यांचे कलेक्शन आहे. कॅज्युअल, फ्युजन पासून भारतीय पोशाखांपर्यंत तुम्ही कशाचेही नाव घ्या आणि त्यांच्याकडे ते आहे.

पाश्चिमात्य कपड्यांप्रमाणेच वेस्टसाईडमधील पारंपरिक भारतीय पोषाखही तितकेच फॅशनेबल आणि आकर्षक आहेत. उत्सा मध्ये बहुआयामी कलेक्शन आहे आणि रोजच्या एथनिक वॉर्डरोब साठीचा तो आधुनिक पर्याय आहे. सर्वाधिक लाडके बॉम्बे पैसले मध्ये समकालीन, सृजनशील, मुक्त आणि फ्युजन कलेक्शन आहे तर वार्क मध्ये प्रसंगयोचीत पारंपरिक पोषाख आहेत जे आधुनिक, समृद्ध आणि सुसंस्कृत आहेत. दुसऱ्या बाजूला झुबा हा रोजच्या दिवसाला वापरायच्या आधुनिक आणि अभिजातता यांचा संगम आहे.

पुरुषांनो, तुम्ही असंतुष्ट आहात का? तुम्हांला असं वाटतंय का की वेस्टसाईडने तुम्हांला झाकोळून टाकले आहे? वेस मध्ये कामाच्या ठिकाणी वापरण्याच्या कपड्यांपासून लाऊंज आणि आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी वापरायच्या कपड्यांपर्यंत वापरायला सुटसुटीत आणि शहरी पोषाख आहेत. मिलेनियल्ससाठी फॅशन सर्वप्रथम येते. त्यांच्याकरता नुओन मेन ही नेहमी प्रवाहात असणाऱ्या सगळ्या फॅशनचा अर्क आहे. ई.टी.ए. हे पारंपरिक छटा असणारे सुटसुटीत शहरी पोषाख आहेत. हे अधिक भारतीयत्वाकडे झुकणारे, कारागिरी असलेले आणि समकालीन पारंपरिक शैलीवरून प्रेरित आहेत.

स्टुडीओ वेस्ट मध्ये केवळ भारतीय महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य प्रसाधन उत्पादनांची मालिका सादर करण्यात आली आहे. विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने, सुवासिक गोष्टी, शाही स्नान आणि बॉडी उत्पादने यांनी समृद्ध असणारे हे कलेक्शन हवेहवेसे वाटणारे, आकर्षक, सृजनशील आहे. आत्मविश्वास असणाऱ्या, प्रकट व्हायला आवडणाऱ्या आणि फॅशनेबल असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारे आहे.

आणखी काय? तुम्हांला अधिक चांगली सेवा मिळावी आणि वेगाने खरेदीचा अनुभव मिळावा यासाठी क्लब वेस्ट मेंबरशीप आहे. त्यामुळे दरवेळी खरेदीतून तुमची काहीतरी कमाई होईल याची खात्री दिली जाते. एकदा पैसे भरले की फॅशन संवादाचा आनंद, वाढदिवसाच्या वेळी सवलत आणि भारतभरात कुठेही वस्तू बदलून देण्याबाबत प्रश्न विचारणा नाही या गोष्टी मिळतात!

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...