‘टपाल ‘ मराठी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने पती बोनी कपूर आणि मुलगी जान्हवी कपूरसोबत हजेरी लावली . श्रीदेवीने सिनेमाच्या टीमला आपल्या शुभेच्छा दिल्या. हा सिनेमा बघितल्यानंतर तिने ट्विटवरून याची प्रशंसा केली. श्रीदेवीने ट्विट केले, ”आताच ‘टपाल’ हा मराठी सिनेमा पाहिला. खूप दिवसांनंतर डोळ्यांत पाणी आले. प्रत्येकाने बघावा असा हा सिनेमा आहे.”रिलीजपूर्वीच तब्बल नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटविलेला बहुचर्चित मराठी सिनेमा ‘टपाल’ येत्या 26 सप्टेंबरला राज्यात सर्वत्र रिलीज होतोय.
यावेळी श्रीदेवी आणि जान्हवी नेहमीप्रमाणे ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या. कपूर कुटुंबासह या स्क्रिनिंगला दिग्दर्शक इम्तियाज अली, आर. बाल्की, गौरी शिंदे यांनीसुद्धा हजेरी लावली होती. शिवाय घरोघरी टपाल पोहचवणा-या पोस्ट मास्तरांनीही सिनेमाच्या स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती. यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर यांनीही ‘टपाल’ सिनेमा अवश्य पाहा, असे आवाहन केले होते.
लक्षण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात कथा एका छोट्या गावातील पोस्टमन, त्याची पत्नी तुळसा आणि शाळेत जाणा-या रंग्या या मुलाच्या भावविश्वावर आधारित आहे. पूर्वीच्या काळात गावामध्ये शिक्षक, पटवारी, पोस्टमन अशी काही मोजकी मंडळी शिक्षित असायची. त्यामुळे त्यांना गावात मोठा मान असायचा. शिवाय पोस्टमन तर लोंकाचे टपाल घरोघरी पोहोचवायचा. त्यामुळे आपल्या माणसांबद्दल माहिती पुरवाणारा दुवा या भावनेतून पोस्टमनसोबत एक भावनिक नातं तयार व्हायचं. हाच धागा पकडत ‘टपाल’ची कथा गुंफण्यात आली आहे.
‘टपाल ‘ने पाणावले श्रीदेवी चे डोळे
Date: