झी गौरव पुरस्कार २०१५ नामांकने जाहीर-यावर्षी रंगणार चित्रगौरव आणि नाट्यगौरव असे दोन पुरस्कार सोहळे

Date:

 

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाचा समजल्या जाणा-या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकने एका रंगतदार कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये यावर्षी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि समीक्षकांनी गौरविलेल्या एलिझाबेथ एकादशी’ने १३ नामांकने मिळवत आघाडी घेतली आहे तर यंदा ब्लॉकबस्टर हिट ठरलेल्या लय भारी’ने तब्बल १२ विभागात नामांकने मिळवली. याशिवाय ‘लोकमान्यएक युगपुरूष’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘क्लासमेट्स’नेही महत्त्वाच्या विभागांमध्ये नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे. व्यावसायिक नाटकांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित भरत जाधव अभिनित ढॅण्टॅढॅण’ या नाटकाला सर्वात जास्त ९ नामांकने मिळाली असून संजय खापरे अभिनित कळत नकळत’ या नाटकाने ८ नामांकने मिळवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये ती’, ‘गोष्ट सिंपल पिलाची’ आणिझोपाळा’ या नाटकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे. यावर्षी रंगणा-या झी गौरव पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी चित्रपटासाठी चित्रगौरव’ आणि नाटकांसाठी नाट्यगौरव’ असे दोन वेगवेगळे रगंतदार सोहळे होणार आहेत. यातील चित्रगौरव’ येत्या १३ मार्चला तर नाट्यगौरव’ २६ मार्चला आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची महावाहिनी असलेल्या झी मराठीचा हा झी गौरव पुरस्कार सोहळा हा मराठी मनाचा जणू मानबिंदू ! वर्षभरात प्रदर्शित होणारे अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट आणि दर्जेदार नाटकांचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा. या कलाकृतींबरोबरच ती घडण्यामागे हातभार लागलेल्या अनेक महत्त्वांच्या विभागांची, कलाकारांची आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीची कार्याची दखल घेणारा पुरस्कार सोहळा अशी झी गौरवची ओळख आहे. आपल्या दशकभराहून अधिकच्या प्रवासात झी गौरव पुरस्काराने चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये विश्वासाचं आणि मानाचं स्थान मिळवलं आहे.

यावर्षीच्या झी गौरव पुरस्कारासाठी मराठी चित्रपट विभागाकरिता जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत झालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला तर नाटकांमध्ये याच कालावधीत रंगभूमीवर दाखल झालेली नाटके (पुनरूज्जीवित नाटके वगळता) प्रवेशासाठी पात्र होती.

यावर्षी चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि विद्याधर पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात संजय मोने, स्वाती चिटणीस आणि रविंद्र दिवकेर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी डॉ. अनिल बांदिवडेकर, विजय केंकरे आणि प्रदीप राणे यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.

चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याची नामांकने…

१) उत्कृष्ट पोशाख
चैत्राली डोंगरे – एलिझाबेथ एकादशी
महेश शेरला – लोकमान्य एक य़ुगपुरूष
पौर्णिमा ओक – रमा माधव
पौर्णिमा ओक – तिचा उंबरठा
गीता गोडबोले – विटी दांडू
२) उत्कृष्ट मेकअप
अतुल सिधये – क्लासमेट्स
विक्रम गायकवाड – लोकमान्य एक युगपुरूष
विनय सहस्त्रबुध्दे- रमा माधव
माल्कम फर्नांडिस – शटर
जगदीश येरे (संकल्पना – विक्रम गायकवाड) – विटी दांडू
३) उत्कृष्ट कलादिग्दर्शन
देवदास भंडारी – तप्तपदी
सचिन भिलारे – एलिझाबेथ एकादशी
प्रशांत बिडकर – किल्ला
संतोष फुटाणे – लोकमान्य एक युगपुरूष
महेश कुडाळकर – विटी दांडू
४ ) उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
गणेश आचार्य – “आला होळीचा सण” – लय भारी
उमेश जाधव – “यहां वहां सारा जहां” – प्यारवाली लव्हस्टोरी
उमेश जाधव – “आली लहर केला कहर” – प्यारवाली लव्हस्टोरी
अक्षता तिखे – “हमाम्मा रे पोरा हमाम्मा” – रमा माधव
जावेद सनादी – “झंपक झंपक झंपक” – मामाच्या गावाला जाऊया
५) उत्कृष्ट संकलन
इम्रान-फैजल – क्लासमेट्स
अभिजीत देशपांडे – एलिझाबेथ एकादशी
जयंत जठार – हॅपी जर्नी
चारू श्री रॉय – किल्ला
राजेश राव – सौ. शशी देवधर
६) उत्कृष्ट छायाचित्रण
महेश अणे – ७ रोशन व्हिला
अमोल गोळे – एलिझाबेथ एकादशी
अविनाश अरूण – किल्ला
संजय मेमाणे – लय भारी
प्रसाद भेंडे – लोकमान्य- एक युगपुरूष
७) उत्कृष्ट ध्वनिरेखाटन
प्रमोद चांदोरकर – क्लासमेट्स
अनमोल भावे – एलिझाबेथ एकादशी
अनमोल भावे – किल्ला
प्रमोद चांदोरकर – लोकमान्य – एक युगपुरूष
अनमोल भावे – मामाच्या गावाला जाऊया
८) उत्कृष्ट पार्श्वसंगीत
सुमीत बेल्लेरी – तप्तपदी
बापी-तुतुल – बाबांची शाळा –
समीर म्हात्रे – लोकमान्य – एक युगपुरुष
संतोष मुळेकर – विटी दांडू
नरेंद्र भिडे – रमा माधव
९) उत्कृष्ट गीतकार
दासू वैद्य – “मनी अचानक” – दुसरी गोष्ट
डॉ. सदाशिव जावडेकर – “उशाशी गंध”- गोंदण
गुरू ठाकूर, अजय-अतुल – “माऊली माऊली” – लय भारी
गुरू ठाकूर – “जीव भुलला” – लय भारी
वैभव जोशी – “हूल देऊनी” – तप्तपदी
१०) उत्कृष्ट पार्श्वगायिका
बेला शेंडे – “बावरे प्रेम हे” – बावरे प्रेम हे
कीर्ती किल्लेदार – “मनी अचानक” – दुसरी गोष्ट
प्रियांका बर्वे – “उशाशी गंध” – गोंदण
नेहा राजपाल – “यमनाची भाषा” – कांकण
मधुरा दातार – “लूट लियो” – रमा माधव
११) उत्कृष्ट पार्श्वगायक
हृषिकेश रानडे – “बावरे प्रेम हे” – बावरे प्रेम हे
हर्ष – अमितराज – “नवे नवे गीत हे मनाचे” – क्लासमेट्स
मंगेश धाकडे – “मनी अचानक” – दुसरी गोष्ट
स्वप्नील बांदोडकर – “ऐकावी वाटते” – गुरूपौर्णिमा
अजय गोगावले – “माऊली माऊली” – लय भारी
१२) उत्कृष्ट संगीतकार
अजय नाईक – “बावरे प्रेम हे” – बावरे प्रेम हे
ट्रॉय – आरिफ – “तुटताना तुटतो हा जीव का” – क्लासमेट्स
मंगेश धाकडे – “मनी अचानक” – दुसरी गोष्ट
प्रितेश मेहता – “यमनाची भाषा” – कांकण
अजय – अतुल – “माऊली माऊली” – लय भारी
१३) उत्कृष्ट कथा
जेम्स अल्बर्ट – क्लासमेट्स
मधुगंधा कुलकर्णी – एलिझाबेथ एकादशी
तुषार परांजपे, अविनाश अरूण – किल्ला
समीर पाटील – पोश्टर बॉईज
जयंत पवार – तिचा उंबरठा
१४ ) उत्कृष्ट पटकथा
मधुगंधा कुलकर्णी – परेश मोकाशी – एलिझाबेथ एकादशी
तुषार परांजपे – किल्ला
समीर पाटील – चारूदत्त भागवत – पोश्टर बॉईज
सचिन कुंडलकर – हॅपी जर्नी
शर्वाणी सुधृत – अमोल शेडगे – सौ. शशी देवधर
१५) उत्कृष्ट संवाद
क्षितिज पटवर्धन – क्लासमेट्स
मधुगंधा कुलकर्णी – परेश मोकाशी – एलिझाबेथ एकादशी
संजय पवार – लय भारी
समीर पाटील – पोश्टर बॉईज
कौस्तुभ सावरकर – सौ. शशी देवधर
१६) उत्कृष्ट बालकलाकार
सायली भांडारकवठेकर – एलिझाबेथ एकादशी
श्रीरंग महाजन – एलिझाबेथ एकादशी
अर्चित देवधर – किल्ला
विवेक चाबुकस्वार – सलाम
निशांत भावसार – विटी दांडू
१७) उत्कृष्ट खल भूमिका
ड्रीम मॉल – सिद्धार्थ जाधव
लय भारी – शरद केळकर
तिचा उंबरठा – चिन्मय मांडलेकर
क्लासमेट्स – सचित पाटील
७ रोशन व्हिला – सोनाली खरे
१८) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
नंदिता धुरी – एलिझाबेथ एकादशी
सुलभा आर्य – गुरूपौर्णिमा
तन्वी आझमी – लय भारी
श्रुती मराठे – तप्तपदी
ज्योती चांदेकर – तिचा उंबरठा
१९) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर – क्लासमेट्स
संदीप पाठक – एक हजाराची नोट
संजय खापरे – लय भारी
हृषिकेश जोशी – पोश्टर बॉईज
तुषार दळवी – सौ. शशी देवधर
२०) उत्कृष्ट अभिनेत्री
उषा नाईक – एक हजाराची नोट
प्रिया बापट – हॅपी जर्नी
सई ताम्हनकर – सौ. शशी देवधर
वीणा जामकर – तप्तपदी
तेजस्विनी पंडीत – तिचा उंबरठा
२१) उत्कृष्ट अभिनेता
भरत जाधव – चिंतामणी
अंकुश चौधरी – क्लासमेट्स
अतुल कुलकर्णी – हॅपी जर्नी
रितेश विलासराव देशमुख – लय भारी
सचिन खेडेकर – शटर
२२) उत्कृष्ट दिग्दर्शक
आदित्य सरपोतदार – क्लासमेट्स
परेश मोकाशी – एलिझाबेथ एकादशी
सचिन कुंडलकर – हॅपी जर्नी
निशिकांत कामत – लय भारी
समीर पाटील – पोश्टर बॉईज
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कृष्ण धवल काळातील गीतांना श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद

पिंपरी, पुणे- जागतिक महिला दिनानिमित्त हौशी गायकांचा कृष्ण धवल...

ज्ञान, शक्ती आणि भक्तीच्या त्रिवेणी संगमातून स्वराज्यनिर्मिती

इतिहास अभ्यासक रायबा नलावडे ; प्रभात मित्र मंडळातर्फे 'शिवसूर्य'...

‘एक पोळी होळीची सामाजिक बांधिलकीची’

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुडमध्ये उपक्रम पुणे-दुष्ट आणि वाईट...