ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशनतर्फे महिलांसाठी पुष्परचना स्पर्धा व प्रदर्शन
पुणे : महिलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशनतर्फे पुष्परचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी (दि. १८)रोजी म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स, डी. पी. रोड येथे ९ ते ११ या वेळेत हि स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांची कलाकृती लोकांसमोर यावी या उद्देशाने ११ ते ७ या वेळेत या पुष्प रचनांचे प्रदर्शनही आयोजित केले आहे अशी माहिती सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी दिली. डॉ. चारुलता बापये यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
कुलकर्णी यांनी सांगितले की, या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेतीना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हि स्पर्धा विनामुल्य असून १८ वर्षाच्या पुढील कोणत्याही वयोगटातील महिला यात सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेत भाग घेऊ इच्छीणारयांसाठी १७ ऑक्टोबर २०१५ रात्री ८ वाजेपर्यत नावनोंदणी करण्याची मुदत आहे. स्व. सौ. ज्योती कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. ज्योती कुलकर्णी यांनी समाजातील इतर महिलांसाठी विविध संधी देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले होते. त्यांचा कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही ह्या फौंडेशनची स्थापना केली आहे.
महिलांमधील सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठीचा स्पर्धेमागील हेतू आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग घ्यावा, तसेच इछुकांनी यात ०२०-६६०४७१०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.