‘ज्योती कुलकर्णी फाउंडेशन’तर्फे विनामुल्य पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन
पुणे : महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यातून इतर महिलांनीही प्रेरणा घ्यावी यासाठी ‘ज्योती कुलकर्णी फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी पुष्परचनेवर आधारित विनामुल्य कार्यशाळेचे येत्या शनिवारी २२ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दुपारी ४ ते ६ या वेळेत म्हात्रे पुलाजवळील रॉयल पार्क, डी.पी. रोड येथे पुष्परचनाकार सरोज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
“महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना नेहमी स्वावलंबी बनविण्याचा ‘ज्योती कुलकर्णी फाउंडेशन’ चा हेतू असतो. या कार्यशाळेद्वारे महिला अधिकाधिक आकर्षक पुष्परचनेचे प्रकार शिकू शकतील व सणासुदीला त्याप्रकारे सजावट करू शकतील.” अशी माहिती फाउंडेशन च्या विश्वस्त अश्विनी देशपांडे यांनी दिली.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी महिलांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही यामुळेच जास्तीतजास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा व इच्छुकांनी ०२० – ६६०४७१०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील अश्विनी देशपांडे यांनी केले आहे.