ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल विनोद यांचे निधन
पिंपरी – ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक गगन झेपचे संपादक विठ्ठल शिवराम विनोद (वय ६१ वर्ष) यांचे चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने बुधवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या मागे १ मुलगा, पत्नी असा परिवार आहे. आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता लिंकरोड येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
विठ्ठल विनोद यांना काल रात्री छातीत त्रास होत असल्याने घराजवळील चिंचवडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
काल पिंपरी पालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. नागकुमार यांचे निधन तर आज ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल विनोद यांचे निधन, एक अधिकारी आणि दुसरे ज्येष्ट पत्रकार असा दोन व्यक्तीच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. माहिती अधिकारातील कार्यकर्ते अशीही विठ्ठल विनोद यांची ओळख होती. त्यांना हेरॉल्ड, कानोसा आदी वृत्तपत्रांमधून त्यांनी काम केले होते.