ज्यांची बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी बांधिलकी नाही , त्यांनी बाबासाहेनाची जयंती साजरी केली नाही तरी चालेल , असे स्पष्ट विचार माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले . पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये जवखेडा , सोनाई , खैरलांजी , पंढरपूर , खर्डा , जामखेड , शिर्डी , दलित आदिवासी अल्पसंख्याकावरील अत्याचाराविरोधात फक्त चर्चा नव्हे , कृतीशील आव्हान ? आत्म सन्मानासाठी युथ ओर्गनाइज्द युनिटतर्फे आयोजित” आत्मसवांद ” या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले कि , आंबेडकर जयंती परिवर्तनवादी विचारांनी साजरी झाली पाहिजे . फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजात रुजले पाहिजे . त्यातून समाजाचे परिवर्तन होणे गरजेचे आहे . पूर्वीच्या प्रमाणे आंबेडकर चळवळ आता राहिली नाही , त्याचबरोबर धर्माची चिकित्सा झाली पाहिजे कोणाचेही वाभाडे काढून यातून चळवळीचा उद्देश काय साध्य होतो . आपण विचारांनीच लढले पाहिजे आज आपण कुठे आहोत याच्याशी आपण ” आत्मसवांद ” साधला पाहिजे . मी कुठे आहे मी माझ्या मनाशी विचारले पाहिजे , सामजिक लढा सशक्त केला पाहिजे . जाती अंत्याच्या लढयामध्ये आर्थिक टप्पा महत्वाचा ठरतो . त्यामागचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे , ते मांडले पाहिजे . जवखेडा , सोनाई , खैरलांजी , पंढरपूर , खर्डा , जामखेड , शिर्डी , दलित आदिवासी अल्पसंख्याकावरील हे हल्ले म्हणजे समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचे हेतूने केलेले आहे . भविष्यामध्ये आपण या हल्ल्यांच्या विरोधात संघर्ष केला नाही तर भविष्यामध्ये साहित्यिक , विचारवंत आणि चळवळीतील काम करणाऱ्यांवर हल्ले होतील . सत्तॆच्या राजकारणामध्ये चळवळ हि गुलाम झाली. सत्तेच्या भुताने मी काही करू शकतो हि उमेद सुद्धा हरविली आहे , आजचे राजकारण तडजोडीचे राजकारण आहे . असे त्यांनी स्पष्ट सांगितले .
दलित हत्याकांडाबद्दल प्रचंड अस्वस्थता असून किती व कासहन करायचं हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे असे उद्गार जेष्ठ सामाजिककार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी काढले. जवखेडाबाबत अट्रासिटी लढा म्हणतात. हे डॉ.आंबेडकरांच्या घटनेला आव्हान आहे. भारताला जातीयता, धर्मांधतेचा रोग जडलाआहे. त्यावर जालीम उपाय करायला पाहिजे. बजाजी निंबाळकर यांचा मुलगा वशिवाजी महाराजांचा जावईला लांद्याची कबर म्हणले जाते. शिवाजी महाराजांचीकन्या सखूचे स्मारक कुठेतरी कोपर्यात आहे. जातीयता, धर्मांधता अवैज्ञानिकआहे हे शाळेत शिकवले जात नाही. देशातले सर्व पक्ष संविधान मान्य करतनाहीत, तोपर्यंत देश घडणार नाही. भारतीय संविधानाला डावलून जायचं नाही हेठरवायला हवे. घटनेची शिकवण घरापासून करायला हवी.तसेच पत्रकार वैभवछाया म्हणाले की, समतेचे कार्यकर्ते एकमेकात संवाद करतनाहीत. वैचारिक, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता नष्ट व्हायला हवी.मागासवर्गीयांच्या अत्याचारविरोधी जे उभे रहातात त्या सर्वाना बरोबरघ्यायला हवे. शोषक, शोशिताना जात नसते. शोषण हि वृत्ती आहे.अत्याचारांविरोधी आवाज उठ्वनार्याना नक्षलवादी व मुस्लिमांना दहशतवादीठरवले जाते. बाबासाहेबांना मानवतावादी बुध्द अपेक्षित होता. शाळेपासूनसंविधानाची शिकवण दिली पाहिजे. जे मेनेज होतात त्या रामविलास पासवान,रामदास आठवलेसारख्यांना मेनेज केले जाते.डॉ.दाभोलकारांसारखे मेनेज होतनाहीत त्यांना मारले जाते. जातीच्या अस्मिता कुरवाळणे बंद करायला हवे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाले. तसेचमुश्ताक पटेल यांच्याकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून सुरवातझाली. यावेळी पत्रकार वैभव छाया , कलमनामाचे संपादक युवराज मोहिते , डॉ. अमोल देवळेकर , रॉबिन घोष , संभाजी भगत, मुश्ताक पटेल , भोलासिंग अरोरा , पुष्पा गाडेपाटील , इकबाल अन्सारी , जावेद खान आदी मान्यवर व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते .लोकशाहीर संभाजी भगत,डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे आदीही व्यासपीठावर होते. कार्यक्रमाच्या सुरुवात संभाजी भगत यांच्या विद्रोही जलसाने झाली . या कार्यक्रमात महात्मा फुलेनी यांच्या सत्य सुखाचा आधार , बाकी सर्व अंधकार हि प्रार्थना सर्वांनी सामुहिकपणे म्हणली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले तर आभार तेजस लोंढे यांनी मानले .