काहे कि शरम है … छोडो तुम युही आहे भरना … जैसा देस वैसा भेस, फिर क्या डरना …हे गाणे आठवत असेल अनेकांना … गाण्यातील या उक्ती प्रमाणे भारताचे पंतप्रधान ज्या देशात जातील तिथला वेश करायला विसरत नाहीत हे आता वैशिष्ट्य म्हणून गणले जाणार आहे त्यांनी काही वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या वेषाला प्राधान्य दिल्याचे फोटो आम्ही येथे देत आहोत
दरम्यान तीन दिवसांच्या चीन दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मंगोलियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान,मोदींनी रविवारी मंगोलियाच्या प्रसिद्ध नादम महोत्सवात सहभाग घेतला. या दरम्यान नरेंद्र मोदी विशेष मंगोलियन पारंपरिक वेशभुषेत आढळले. सुमो रेसलिंग मॅच पाहिल्यानंतर मोदींनी तिरंदाजीतही हात आजमावले. त्याआदी त्यांनी मंगोलियाच्या म्युझिक इन्स्टुमेन्ट वाजवले होते. नादम महोत्सवाचा समावेश युनेस्कोच्या पारंपरिक मेळाव्यांमध्ये सहभागी करण्यात आला आहे. मंगोलिया युनिव्हर्सिटीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आयटी ट्रेनिंग सेंटरची पायाभरणीही केली.
त्याआधी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या काही करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. मंगोलियात रेल्वे वाहतूक, सायबर सेक्युरिटी सेंटर बनवण्याच्या मदतीची घोषणाही केली. त्याशिवाय सीमा आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात मदत देण्याचेही आश्वासन दिले. त्यानुसार दोन्ही देश संयुक्त युद्धअभ्यासही करतील. पीएम मोदी म्हणाले की, या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वाढेल