पुणे- आज पुणे फेस्टिव्हल चे शानदार उद्घाटन झाल्यानंतर जॅकी श्रॉफ,प्रेम चोप्रा , अजय अतुल आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना तर पुणे फेस्टिव्हल पुरस्कार जॅकी श्रॉफ , अजय अतुल ,आणि दो उमा नटराजन यांनाप्रदान करण्यात आला . अभिनेत्री बिंदू हेमामालिनी यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला
पालकमंत्री गिरीश बापट , मंत्री दिलीप कांबळे , उद्योगपती राहुल बजाज , माजी खासदार आणि पुणे फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुरेश कलमाडी , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , अभिनेत्री पूनम धिल्लन , अभिनेता शेखर सुमन तसेच कृष्णप्रकाश गोयल ,डॉ. सतीश देसाई , कृष्णकांत कुदळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते