पुणे, ता. 28: (प्रतिनिधी) मुंबईच्या धर्तीवर पुण्यात जुन्या वाड्यासाठी दुरूस्ती महामंडळ स्थापन करण्यासाठी येणार्या काळात पाठपुरावा करणार. यामुळे शहरातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीत राहणार्या नागरिकांना दिलासा मिळेल. सत्तेत आल्यास अशा रहिवाशी व भाडेकरूंसाठी विशेष योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच, शहरातील वाहतुकीचा प्रश्न खूपच बिकट होत चालला आहे, तो सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार. असे मत कसबा विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचार पदयात्रे दरम्यान काढले.
कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 58 मध्ये आज बापट यांची पदयात्रा झाली. सकाळी दहा वाजता अकरा मारुती येथून या पदयात्रेला सुरवात झाली. त्यानंतर शुक्रवार पेठ येथील विविध भागात फिरून मतदारांचे प्रश्न समजून घेण्यात आले. अकरा मारुती चौक परिसरातील नागरिकांच्या समस्या बापट यांनी जाणून घेऊन सुभाष नगर, राष्ट्रभूषण चौक, खडके गणेश मंदीर या भागात मतदारांशी संवाद साधण्यात आला. नंतर खडकमाळ आळ करत गुरुवार पेठ येथे या पदयात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी गिरीश बापट यांनी मतदारांशी बोलताना नाकर्त्या आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी नगरसेवक अशोक येणपुरे, प्रतिभाताई ढमाले, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश ऐनपुरे, उदय लेले, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, सोहन भोसले, अनिल थिटे, विजय मरळ, महेश गोखले, संदीप खरडेकर, आनंद मालेगांवकर, भारत निजामपूरकर, दीपक पोटे, सुहास कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, नामदेव माळवदे, अमित कंक, मुकेश पायगुडे, निलेश वैराट, संजय पायगुडे, कुमार रेणुसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई गोखले, शाबाना देशपांडे, सीमा जांभुळकर, चारू शिंदे, क्रांती खंडारे, वर्षाताई धोंगडे, मृणाल घोळे, कल्पनाताई जाधव आदी उपस्थित होते.