कसबा पेठ हा पुणे शहराचे भूषण असलेली एक ऐतिहासिक पेठ आहे. बारा बलुतेदारांसह सर्व समाज इथं गुण्यागोविंदाने आजही नांदत असून पुण्याची वाडा संस्कृतीचे जतन येथेच होत आहे. येथील वाडे जुने आहे याची मला जाणिव आहे. पण सर्वच वाड्यांचे प्रश्न सारखे नसल्याने ते एकत्रित सोडवण्याऐवजी प्रत्येक वाड्याचे प्रश्न स्वतंत्रपणे सहजसुटू शकतात आणि ते मी सोडविन असे कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट आघाडीचे उमेदवार डॉ. रोहित टिळक यांनी आज येथे सांगितले.
पुण्याचे ग्राम दैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन टिळक यांनी पदयात्रेव्दारे मतदारांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्या समावेत काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबरच तरूण नव्या पिढीतील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. नगरसेवक मिलिंद काची, माजी नगरसेवक बुवा नलावडे, अरूण को-हाळकर, जयसिंग भोसले, विद्या भोकरे, रोहन भांड, नरेश नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक चौकाचौकात मंडळांचे कार्यकर्ते टिळक यांचे उत्साहाने स्वागत करत होते.
कसबा गणपती मंदिरापासून पदयात्रा सुरू झाली. प्रत्येक गल्लीबोळात जाऊन टिळक यांनी मतदारांशी संवाद साधला. मोटे मंगल कार्यालय, सूर्या हॉस्पिटल, पवळे चौक, तांबट हौद, तांबट आळी, शिंपी आळी, गुंडाचा गणपती, व्यवहारे आळी, साततोटी चौक, योजना हॉटेल, गावकोस मारूती, झांबरे चावडी, नवदीप मंडळ, फडके हौद, लोणार आळी, लोणार आळी, दूधभट्टी परिसर, सोन्यामारूती चौक, सिटी पोस्ट, श्रीकृष्ण टॉकीज, सायकल दवाखाना, म्हसोबा मंदीर येथे पदयात्रेचा समारोप झाला.