पुणे- मराठी तील जुने सिनेमे आणि जुनी गाणी आजही प्रचंड श्रावणीय आणि लक्षणीय अशीच आहेत अशा सिनेमांची पुनर्निर्मिती करून ते केवळ विदेशी चित्रपट महोत्सवात दाखवण्यापुरते च न ठेवता त्यांना जागतिक बाजारपेठ -म्हणजे जगभरात ते कसे प्रदर्शित होतील यासाठी आम्ही काही योजना आखीत आहोत . यासाठी येत्या ५ वर्षात २५० कोटींची गुंतवणूक कि सिनेनिर्मिती क्षेत्रात करणार असल्याची घोषणा येथे निर्माती-दिग्दर्शिका नंदिता सिंघा यांनी येथे केली
आजवर मराठी चित्रपट केवळ आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखविला जात होता परंतु आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झालाच पाहिजे यासाठी आमची टोटल प्रेझेन्टेशन डिव्हायसेस लिमिटेड हि संस्था प्रयत्न करणार आहे असे त्या म्हणाल्या
अनेक हिंदी चित्रपट करणाऱ्या निर्मात्या -दिग्दर्शिका नंदिता सिंघा आता मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण करीत आहेत . याबाबतची घोषणा आज त्यांनी पुणे येथे पत्रकारपरिषद घेवून केली . मराठी साहित्य आणि नाटक परंपरा अत्यंत दर्जेदार आणि संस्कृतीदर्शक अशी असल्याने आपण मराठी सिनेमा निर्मितीमध्ये रस घेतला आहे . विशेष म्हणजे अभिजात मराठी ,क्लासिक मराठी जुन्या चित्रपटांची आणि श्रवणीय गाण्यांची पुनर्निर्मिती करण्यावर आपला भर राहील त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व स्तरावरील प्रतिभावंत कलाकार यांना संधी देणार आहे . असेही त्यांनी सांगितले
त्या पुढे म्हणाल्या , ‘आज संपूर्ण भारतात १७ लाख पत्रकार बेरोजगार असून त्यांच्या कुटुंबांची वाताहत होत आहे , हे मला पाहवत नाही , कारण समाजाचे खरे हिरो हे पत्रकारच असतात , तेच नेते -अभिनेते -घडवतात . आणि हाच वर्ग स्वतः मात्र विवंचनेत आहे त्यातल्या त्यात क्राइम रिपोर्टर्स ची अवस्था दयनीय आहे सकाळी वर्तमान पत्राच्या कार्यालयात गेलेला क्राईम रिपोर्टर सायंकाळी घरी सुखरूप पोहोचेल कि नाही याची शाश्वती उरलेली नाही याच धर्तीवर आपण तब्बल चार चित्रपटांची निर्मिती करीत आहोत नुकतेच गाजलेले ‘जे डी हत्याकांड’ हि घटना केंद्रस्थानी घेवून कथानक तयार करण्यात येते आहे इतकेच नव्हे तर’वेन्सडे , ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’ चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या सहभागाने देखील आपण चित्रपट करीत आहोत पुढील पाच वर्षात एकूण २५० कोटी रुपयांची गुंतवणूक आपण चित्रपट निर्मितीत करण्याचा मानस आहे

