सातारा(जिमाका) : आज जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे अयोजन करण्यात आले होत. या राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उर्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 2 कोटी 8 लाख 86 हजारांची वसुली करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. अनिता नेवसे यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघाच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा व सत्र न्यायालय व 11 तालुक्यांच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांनी केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, वकील संघाचे अध्यक्ष अजय डांगे, इतर न्यायाधीश, वकील वर्ग, बँकेचे अधिकारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये बँकांची वसुली दिवाणी प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 अन्वये 734 प्ररकणे व वादपूर्व 6 हजार 844 प्रकरणे ठेवण्यात आली होती.
या राष्ट्रीय लोकअदालतीत बँक वसुलीची प्रकरणे मिटविण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. यामध्ये एकूण 3 पॅनेल करण्यात आले होते व राष्ट्रीय लोकदालतीमध्ये 311 प्रकरणे तडजोडी करुन 2 कोटी 8 लाख 86 हजारांची वसुली करण्यात आली, असेही डॉ. नेवसे यांनी सांगितले.