नवी दिल्ली- नागरिकत्व विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया यूनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी 6 बसेससह 8 गाड्यांना जाळले. जामियाशिवाय अलीगड, बनारस आणि बंगालमधील जाधवपूर यूनिव्हर्सिटीमध्येही विद्यार्थ्यांनी दोरदार प्रदर्शन केले. अलीगड मुस्लिम यूनिवर्सिटी (एएमयू)च्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात अंदाजे 60 विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज अलीगड शहरात रात्री 10 बंद राहील. तर सहारनपूरमध्ये पुढील आदेश मिळेपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील 6 जिल्हे मेरठ, बुलंदशहर, कासगंज, बागपथ, सहारनपूर आणि बरेलीमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे.
एएमयू आणि जामिया प्रशासनाने 5 जानेवारीपर्यंत सुट्टी दिली आहे. रजिस्ट्रार अब्दुल हमीदने सांगितले की, रविवारी सर्व हॉस्टेल रिकामे करण्यात आले. त्यांना बस आणि ट्रेनने घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. एडीजी पोलिस अजय आनंदने सांगितले की, अलीगडमध्ये परिस्थिति नियंत्रणात आहे. शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दक्षिण दिल्लीतील शाळांना आज सुट्टी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना शांती ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर दिल्लीमध्ये जामियामध्ये हिंसाचारानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी ओखला, जामिया, न्यू फ्रेंड्स कॉलोनी आणि मदनपूर खादर परिसरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हिंसेनंतर दिल्लीतील 14 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले, त्यांना आज सुरू करण्यात येईल.
अट केलेल्या जामियाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडले
जामियाजवळ जमा झालेल्या आंदोलकांनी 8 गाड्यांना आगीच्या स्वाधिन केले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडला. विद्यार्थी संघटनेचा दावा आहे की, 100 आंदोलक जखमी झाले तर एकाचा जीव गेला आहे. या सर्व हिंसेनंतर पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पण, नंतर झालेल्या विरोधामुळे सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले.