महाराष्ट्रातच सन 2018 मध्ये जागतिक करंडक शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजनही करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर श्री. प्रिंट्रेंका बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाचे सरचिटणीस यानु कुलान, विपणन संचालक हेक्टर कॅब्रेरा, भारतीय शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष सतपाल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त राजाराम माने, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे उपस्थित होते.
राज्य शासनाने व क्रिकेट संघटनांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत देऊ केलेल्या सहकार्याचे स्वागत करुन शालेय स्तरापासून खेळाडूंची प्रतिभा वृद्धिंगत होऊन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी व्हावेत, असा या स्पर्धेमागचा हेतू असल्याचेही श्री. प्रिंट्रेंका यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या अशा स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन लवकरच या क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती श्री. सतपाल यांनी दिली. ब्राझीलमधील रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय कुस्तीगीर चांगली कामगिरी करुन सुवर्णपदक पटकावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.