पुणे-
पुण्यातील रुग्णाचे हृदय मुंबईतील २२ वर्षीय रुग्णाला यशस्वीपणे प्रत्यारोपण करून आदर्श वैद्यकीय सेवेचे दर्शन घडविल्याबदल जहांगीर रुग्णालयाचे हृदय शल्य चिकित्सक डॉ. संजीव जाधव व रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. मनीषा बोबडे यांचा मनजितसिंग विरदी फाऊडेशनच्यावतीने सन्मानपत्र व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी फाऊडेशनअध्यक्षचे मनजितसिंग विरदी , मेजरसिंग कलेर , विकास भांबुरे , आरती संघवी , महेश जांभुळकर , मनप्रितसिंग विरदी , विजय भोसले , वृंदा शहा आदी उपस्थित होते .
पश्चिम भारतात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जहांगीर रुग्णालयाने आदर्श वैद्यकीय सेवेचे दर्शन घडविले असून हृदय शल्य चिकित्सक डॉ. संजीव जाधव यांनी केलेले काम हे पुनर्जीवन देणारे ठरले त्याबद्दल त्यांचा सन्मान केला आहे .
सध्याच्या काळात अवयव दानाची जनजागृती करणे गरजेचे असून मनजितसिंग विरदी फाऊडेशनने याकामी पुढाकार घ्यावा असे मत डॉ. संजीव जाधव यांनी व्यक्त केले तर रुग्णालयाने केलेल्या हृदय प्रत्यारोपणात हृदय दान करणाऱ्या रुग्णाच्या कुटुंबाच मोठ योगदान आहे असे मत वैद्यकीय संचालिका डॉ. मनीषा बोबडे यांनी व्यक्त केले .
विकास भांबुरे यांनी प्रास्ताविक केले तर मनप्रितसिंग विरदी यांनी आभार मानले .