पुणे-महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहरातील जलतरण तलावावरील सुरक्षितता, करण्यात आलेल्या
उपाय योजना, जीवरक्षकांना देण्यात प्रशिक्षण याकरिता पुणे महानगरपालिकेस आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘‘कॉमनवेल्थ
प्रेसिडेंट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे
यु के मधील कॉमन वेल्थ हेड क्वार्टर, वॉरविकशायर येथील कॉमन वेल्थ लाईफ सेव्हींग, द रॉयल लाईफ
सेव्हींग सोसायटीचे अध्यक्ष एच आर एच प्रि़न्स मायकेल ऑफ केंट (जीसीव्हीओ) असून उपाध्यक्ष क्लाईव्ह हॉलंड आहेत .
राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी (इंडिया) चे अध्यक्ष सेवानिवृत्त रियर अॅडमिरल पुरुषोत्तम दत्त शर्मा हे
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉमनवेल्थ लाईफ सेव्हींग, द रॉयल लाईफ सेव्हिंग सोसायटीचे सदस्य असून त्यांच्या हस्ते
‘‘कॉमनवेल्थ प्रेसिडेंट अॅवॉर्ड पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. कुणाल कुमार यांनी नुकतेच प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी वानवडी येथील मनपाच्या जलतरण तलावाचे व्यवस्थापन करणारे जॉर्ज विश्वास घोलप व अन्य अधिकारी
उपस्थित होते. पुणे मनपातील मा. आयुक्त कार्यालयात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) च्या उपाध्यक्ष श्रीमती कविता
शर्मा यांनी सांगितले की, जलतरण तलावामध्ये अपघात होऊ नयेत, तरुणांचे जीव धोक्यात येऊ नये तसेच त्याकरिता
अर्थात जलतरण तलावाकरिता कार्यरत असणारे कर्मचारी, जीवरक्षक यांना प्रशिक्षण देणे, जलतरण तलाव बांधणारे
व्यावसायिक यांना मार्गदर्शन करणे, व एकूणच सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्था कार्यरत असून पुणे मनपाच्या सहकार्याने
विना मोबदला सदरची संस्था मनपाच्या जलतरण तलावावर मार्गदर्शन करणे,प्रशिक्षण देणेकरिता सन २००१ पासून
विना मोबदला कार्यरत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले असून सन २०१० पासून मनपाच्या जलतरण
तलावावर अपघात, जिवीत हानी झाली नाही, आजपर्यंत सुमारे दहा हजारापेक्षा अधिक जीवरक्षकांना प्रशिक्षित करण्यात
आले असून सदरचे प्रशिक्षित जीवरक्षक संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर व देश विदेशात कार्यरत आहेत. पुणे
मनपाच्या जलतरण तलावांचा अभ्यास करुन ज्या उपाय योजना संस्थेच्या वतीने आल्या सुचविण्यात त्याबाबत पुणे
मनपाने वेळोवेळी दखल घेऊन उत्कृष्ट कामकाज केले व उत्तम दर्जा राखला आहे. या संदर्भात आंतरराष्ट्रीय
स्तरावरील कॉमन वेल्थ लाईफ सेव्हिंग, द रॉयल लाईफ सेव्हिंग सोसायटीने याबाबत माहिती मागविलेली होती. त्या
अनुषंगाने पुणे महानगरपालिकेनी महापालिकेच्या जलतरण तलावावर केलेल्या उपाय योजना, सुधारणा, जीवरक्षकांना
देण्यात आलेले प्रशिक्षण याबाबत निकषांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरील संस्थेस सदरचा आंतरराष्ट्रीय
‘‘कॉमनवेल्थ प्रेसिडेंट अॅवॉर्डङ्कङ्क दिल्याचे सांगितले.
राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) ही संस्था पुणे शहरात १७ वर्षे कार्यरत असल्याचे त्यांनी
सांगितले.