अहो, अमिताभ ने मागितली शाहरुख ची माफी… बिच्चारी रेखा हि हळहळली ?
मुंबई- तशी जया बच्चन वाईट आहे असे कोणी म्हणत नाही , पण त्यांच्या फटकळ बोलण्याचे पडसाद मोठ्ठे उमटत आहेत आणि त्याचे आता गॉसीप हि होवू लागले आहे ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटावर जळजळीत टीका करून जयाबाईंनी किंग खान शाहरुखला दुखावलं होतं. त्याबद्दल अमिताभ यांनी शाहरुखला मेसेज करून दिलगिरी व्यक्त केली आहे.जया बच्चन यांच्या ‘बोलबच्चनगिरी’मुळे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर हि दुसऱ्यांदा माफी मागण्याची वेळ आली आहे
शाहरुख-गौरी खानच्या ‘रेड चिलीज’चा ‘हॅपी न्यू इअर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचतोय. केवळ अभिषेक असल्यानंच मी हा सिनेमा पाहिला, नाहीतर असल्या चित्रपटांच्या वाटेला मी जात नाही. आज चित्रपटनिर्मिती ही कला राहिली नसून, धंदा झालाय आणि म्हणूनच आपण सिनेमात काम करणं बंद केलंय, असा सतापही जया बच्चन यांनी व्यक्त केला होता. तरुणाईला हा ‘टीपी’ आवडलाय आणि त्यातला अभिषेक बच्चन तर ‘फुल टू हिट’ झालाय. पण, खवचट बोलण्यासाठी, खाष्टपणासाठी (कु)प्रसिद्ध असलेल्या जया बच्चन यांनी या सिनेमाचे जाहीर वाभाडे काढले आणि सगळेच चक्रावले. मी आजवर पाहिलेल्या चित्रपटांमधील हा सगळ्यात वाईट आणि अर्थहीन सिनेमा आहे, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली होती.
जयाबाईंच्या या रोखठोक प्रतिक्रियेवर इंडस्ट्रीत तीव्र पडसाद उमटलेत. वास्तविक, कितीही वाईट सिनेमा असला तरी इंडस्ट्रीतला कुणीही कलाकार जाहीरपणे त्याची ‘लायकी’ काढत नाही. पण जयाबाईंनी तर आपल्या मुलानं काम केलेल्या चित्रपटावरच टीका केली. शाहरुख, गौरी, दिग्दर्शिका फराह खानच्या धंदेवाईक वृत्तीवर ताशेरे ओढले. ही टिप्पणी चुकीची आहे असंही नाही. पण अभिषेकच्या करिअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो, हे दूरदर्शी आणि अनुभवी अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आलं. ते टाळण्यासाठीच, बॉलिवूडच्या ‘शहेनशहा’नं आपल्या पत्नीच्या चुकीबद्दल ‘बादशहा’ची माफी मागितली आहे. शाहरुख किंवा त्याच्या चित्रपटाचा अपमान जयाला करायचा नव्हता, असा खुलासाही बिग बीनी केला आहे.