श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. जोतिबा चौगुले (वय 36 रा. महागाव, ता.गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे या शहीद जवानाचे नाव आहे. जोतिबा चौगुले जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. सोमवारी (दि.16) राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जोतिबा चौगुले हे शहीद झाले. ही बातमी समजताच चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले शहीद
Date:

