वॉशिंग्टन : कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या अमेरिकेच्या ‘व्हाइट हाऊस’च्या परिसरामध्ये शनिवारी मोठ्या आवाजासह आगीच्या ज्वाळा पसरल्या. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ‘व्हाइट हाऊस’च्या ‘साऊथ लॉन’जवळील रस्त्यावरून हा आवाज आला. . साऊथ लॉनच्या बाजुने हा धमाकेदार आवाज ऐकू येताच तेथील सुरक्षा विभागाने या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करून तपासाची चक्रे फिरविली. अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे कुटुंबियांसोबत हेलिकॉप्टर व्हाईट हाऊस परिसरातील तळावरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाचा हा जोरदार धमाका झाला. गुप्तचर सेवा अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करीत पत्रकार कक्षाकडे धाव घेत त्यात सर्व पत्रकारांना आतच ठेऊन कुलुप घातले. सुदैवाने ओबामा आणि त्यांचे कुटुंब साऊथ लॉनमध्ये नव्हते. ते हेलिकॉप्टरने अॅण्ड्र्यूज एअर फोर्स तळाकडे जाणार होते.