भोपाळ – अगोदर जनतेला स्वप्ने दाखवायची आणि नंतर कोलवायचे असाच प्रकार आता भाजपने मतदारांशी केल्याचे वाटू लागले आहे त्याला कारण हि तसेच घडते आहे ‘अच्छे दिन‘ची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘अच्छे दिन‘ यायला 25 वर्षे लागतील असे म्हटले आहे.भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी भाजपला या 25 वर्षांमध्ये ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक जिंकावी लागणार आहे, असे शहा म्हणाले.
‘अच्छे दिन‘ यायला 25 वर्षे लागतील -अमित शहांचे वक्त्यव-(जनतेला बनविले उल्लू … ?)
भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीवेळी अच्छे दिन आनेवाले है असे जाहिराती केल्या होत्या. देशातील नागरिकांनी भाजपला भरभरून मतदान करत सत्तेत आणले होते. आता अमित शहा यांनी अच्छे दिनसाठी 25 वर्षांची वाट पहायला लागणार असल्याचे म्हटले आहे.
शहा म्हणाले, इंग्रज राजवटीच्या आधीचा काळ देशाच्या वाट्याला पुन्हा आणणे. हेच खरं अच्छे दिनाचे आश्वासन होते. येत्या पाच वर्षात अर्थ, परराष्ट्र, सुरक्षा, रोजगार यांच्या धोरणात योग्य बदल भाजप घडवेल. मात्र, जगात भारताला सर्वश्रेष्ठ बनवायचे असेल. देशाचे अच्छे दिन आणायचे असतील. तर त्यासाठी 25 वर्ष हवीत. शिवाय त्याचसोबत पंचायत ते संसदेपर्यंत भाजपची भरभराट व्हायला हवी.‘‘