छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणं चुकीचं असल्याचं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे. राजे हे राजे आहेत त्यामुळे अशा गोष्टींना लगाम घालणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. पुण्यातआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गोखले म्हणाले, “मी मोदीभक्त नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी सबंधित नाही. तसेच कोणाचाही झेंडा मी खांद्यावर घेतलेला नाही. त्यामुळेच या गोष्टी बोलतो आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांची मोदींसोबत तुलना करणे चुकीची आहे. राजे हे राजे आहेत. अशा गोष्टींना लगाम घातला पाहिजे.”