Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

चेंजमेकर्स चा हा महिला सबलीकरणाचा उपक्रम आगळा वेगळा : खासदार सुप्रिया सुळे

Date:

पुणे :

‘स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणण्याची महिलांची, नागरिकांची शक्ती लक्षात घेवून त्यातून स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभलेला हा उपक्रम स्पर्धात्मक होता. विजेत्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

हा कार्यक्रम आज दिनांक 25 मार्च रोजी दुपारी बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला.
यावेळी ‘स्माईल’ च्या संस्थापक, खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्‍विनी कदम,  रवींद्र माळवदकर, दर्शना परमार, मकरंद टिल्लू, रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ईश्‍वर परमार ग्रुप’, ‘संजय कुंभारे गु्रप’ यांनी या उपक्रमासाठी सहयोग दिला.

खा.सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या, ‘‘चेंजमेकर्स’ हा वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला महिला सबलीकरणाचा हा उपक्रम आगळा वेगळा आणि स्तुत्य आहे. उपक्रमातील सहभागी महिलांनी केलेल्या कामाच्या चित्रफिती पहाताना त्यांच्या कामाचे कर्तृत्व लक्षात येते. या सर्व चित्रफिती पाहून मलाही या महिलांकडून खूप काही शिकायला मिळाले. महिलांमध्ये कायम सातत्य व चिकाटी असते, त्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम इथेच न थांबता तो कायम सुरू रहावा व राहील अशी मला खात्री आहे.’

खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘स्माईल संस्थेच्या  ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दि. 5 जून 2014 रोजी शुभारंभ करण्यात आलेल्या ‘चेंजमेकर्स’ उपक्रमात 125 गटांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये, नागरिकांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढला. स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी महिलांना-नागरिकांना कार्यरत करणार्‍या ‘चेंजमेकर्स’ या  उपक्रमाचा उपयोग होत आहे.’

‘छोटी छोटी पावले मोठे बदल घडवून आणतात, यावर विश्‍वास असणार्‍या नागरिकांसाठी ‘चेंजमेकर्स’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे. आपण बदल घडवू शकतो, याचा अनुभव या उपक्रमात सहभागी झालेला प्रत्येक महिलेने आणि नागरिकांनी अनुभवले. सरकारच्या बरोबरीने प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्थानिक पातळीवर पाऊले उचलणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम पुण्यात सुरू केला, असेही खा.वंदना चव्हाण यांनी सांगितले.

महापौर दत्ता धनकवडे बोलताना म्हणाले, ‘पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभलेला ‘चेंजमेकर्स’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. महिलांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन अशाप्रकारे गटाद्वारे उपक्रम केल्यास पुणे शहर बदलायला वेळ लागणार नाही.’

शहरातील विविध भागांत नागरिकांचे गट तयार करून निवडलेल्या परिसरातून विकास घडविण्यासाठी पुढाकार घेऊन चांगले उपक्रम परिसरात राबविण्यासाठी ‘चेंज मेकर्स’ च्या या उपक्रमात सहभागी झालेल्या महिला पुण्यातील सिंहगड रस्ता, सहकारनगर, वारजे- कर्वेनगर, पर्वती, बिबवेवाडी, भवानी पेठ, कोंढवा -वानवडी परिसर या विभागातील होत्या. या स्पर्धेचे परिक्षण महाराष्ट्र टाईम्स चे पराग करंदीकर, आणि लोकसत्ताचे मुकुंद संगोराम आणि खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केले होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजाता शेणई यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी विविध महिला गटांनी विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले.  ‘चेंजमेकर्स’च्या प्रमुख समन्वयक नीला विद्वांस आणि त्यांच्या सहाय्यक संजिवनी जोगळेकर व प्रदीप्ता कुलकर्णी यांनी या चेंजमेकर्स उपक्रमासाठी समन्वयक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी समूह संघटीकांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर चंचला कोद्रे, वैशाली बनकर, रूपाली चाकणकर, शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी आमदार बापू पठारे, कमल ढोले-पाटील, मनाली भिलारे (संघटक युवती राष्ट्रवादी काँग्रेस), श्‍वेता होनराव,  सुहास पटवर्धन आदी  उपस्थित होते.

   स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :

प्रथम क्रमांक (विभागून) –
1)जनता वसाहत, वैदुवाडी- वैशाली दारवटकर-रोख पन्नास हजार रूपये
2) अंजली लोखंडे -रोख पन्नास हजार रूपये

द्वितीय क्रमांक (विभागून):
1) पद्मा कांबळे -रोख पंचवीस हजार रूपये
2) राणी खत्री- रोख पंचवीस हजार रूपये

तृतीय क्रमांक (विभागून)
1) नीलिमा पारवडे (गॅस दुरूस्ती)-रोख साडे बारा हजार रूपये
2) दांडेकर पूल सुरेखा भोसले- रोख साडे बारा हजार रूपये

उत्तेजनार्थ ः प्राजक्ता कलगुंडे , संध्या शिर्के, सुषमा पाचंगे

विशेष पुरस्कार – शैला साठे (शौर्य ः सुतारदरा), शीतल कुंभार (महिला सक्षमीकरण ), माधुरी कुंभारे (ज्येष्ठ नागरिक)

उल्लेखनीय : नीता तुपारे
———————————–

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...