चिमूकल्यांनी नृत्यातून दिला एकतेचा संदेश
पुणे : बॉम्बे केंब्रीज स्कूल, वारजे येथील विद्याथ्र्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला. यावेळी विविध वयोगटातील मुलांनी नृत्य, गायन व वादनाच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला. कोळी नृत्य, नाताळ आदी नृत्याविष्कार सादर करून विद्याथ्र्यांनी वैविध्यतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. शिशू गटातील विद्याथ्र्यांनी ‘भुमरो भुमरो, qजगल बेल qजगल बेल यांसारख्या गाण्यावर धरलेला ठेका म्हणजे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. चिमुकल्यांच्या डोळ्यातील निरागस हावभाव आणि निडरपणे त्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केलेले नृत्य यामुळे ते उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश घुले, कात्रज दूध डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक क्षीरसागर, बॉम्बे केंब्रीज स्कूलचे श्री. सुकेश शेट्टी, चंद्रशेखर परदेशी आदी उपस्थित होते. लहान मुले कोणत्याही गोष्टीचे अनुकरण तात्काळ करतात, त्यामुळे त्यांना टिव्हीपासून दूर ठेवा असा सल्ला क्षीरसागर यांनी दिला.
घुले म्हणाले की, आपला देश २०२० साली महासत्ता होणार असून आपल्या देशाचे भवितव्य तरूण पिढीवर अवलंबून आहे. यासाठी त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणेही आवश्यक आहे. आजही आपल्या राज्यातील अनेक शाळांची बिकट परिस्थिती आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सरकारी यंत्रणांबरोबरच खासगी, सेवाभावी संस्था व काही कुटुंबांनी ही यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास ही परिस्थिती सुधारू शकेल, असा आशावादही घुले यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी तर आभार यांनी मानले.