पुणे-चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीष बापट यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . सदाशिव पेठेतील काकडे जोग सदनमध्ये या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला . या उद्घाटन सोहळ्यास चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड संचालक प्रशांत धुमाळ , संचालक संतोष रोकडे , मुख्य वितरक क्रांती खांडरे , सुहास कुलकर्णी , महेश धुमाळ , अंकुश साळुंके , सयाजी शेंडकर , वनश्री चंदवालिया , महेंद्र गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते .
चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड पुणे शहर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात विविध दुग्ध खाद्य पदार्थ वाजवी व माफक दरात विक्री करीत आहे . यामध्ये गायीचे दुध व गायीचे शुध्द गावरान तूप विक्रीसाठी उपलब्ध आहे . त्यामध्ये एक लिटर गायीच्या दुधासोबत १५ ग्रमचे १० रुपयाचे गायीचे तूप मोफत पाकीट देण्यात येते . अशी माहिती चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड संचालक प्रशांत धुमाळ यांनी सांगितले .
या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक विष्णू हरिहर , नगरसेवक दिलीप काळोखे , नगरसेवक धनंजय जाधव , बाळासाहेब मालसुरे , स्वीकृत नगरसेवक नामदेव माळवदे , प्रमोद कोंढरे , राजू परदेशी , विशाल पवार , स्वीकृत नगरसेविका शोभा गोखले , माजी नगरसेविका मदिना तांबोळी , माजी नगरसेविका कल्पना जाधव , सातारा तहसीलदार आशा होळकर , भोर सर्कल अधिकारी सुषमा लक्षशेट्टी , आशा शिंदे , वनमाला शिंदे , योगिता गोगावले , रागिणी खडके , मुक्ता खंडागळे , अभिनेते मिलिंद शिंत्रे ,नितीन जाधव , सयाजी शेंडकर ,आशिष काळे, नितीन खिरीड , ज्ञानेश्वर भापकर , मधुकर चिल्लाळ आदी मान्यवर व दुग्ध व्यावसयिक उपस्थित होते .