
पुणे: खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीमधील मे. हर्षल प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात
वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार करून 54 हजार 965 युनिटस्च्या 6 लाख 89 हजार 70 रुपयांची वीजचोरी झाल्याचे
नुकतेच उघड झाले. याप्रकरणी पुणे येथील महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकण एमआयडीसीमधील हर्षल प्रेसिंग प्रायव्हेट
लिमिटेड ही कंपनी महावितरणची उच्चदाब वीजग्राहक आहे. या कंपनीत विजेच्या वापराची नोंद होऊ नये यासाठी
वीजमीटरकडे जाणार्या वीजयंत्रणेमध्ये फेरफार करण्यात आल्याचे महावितरणच्या तपासणीत निदर्शनात आले. यात हर्षल
प्रेसिंग कंपनीने 20 जुलै ते 1 ऑक्टोबर 2015 या कालावधीत 54 हजार 965 युनिटस्च्या 6 लाख 89 हजार 70 रुपयांची
वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. कंपनीमधील वीजचोरीचा पंचनामा करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
याप्रकरणी कंपनीचे संचालक अरुण जगन्नाथ वराडे व इतर यांच्याविरुद्ध शुक्रवारी (दि. 2 ऑक्टो.) रास्तापेठ (पुणे) येथील
महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 135 व 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

